बिबवेवाडी तपासपथकाची धडाकेबाज़ कामगिरी ! जुन्या भांडणाचे कारणावरून खुनाचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीना केली अटक,


पंकेश जाधव संपादक 7020794626

बिबवेवाडी पोलिस स्टेशन पुणे शहर

महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दिनांक ०३/०८/२०२४ रोजी रात्री ११.३० वाजता फिर्यादी हे अर्चना टेरेस सोसायटी पापळ वस्ती बिबवेवाडी पुणे येथे आले असताना जुन्या भांडणाचे कारणावरून गुन्हयातील आरोपी धिरज कोरके, कुमार भागवत व शुभम धोत्रे यांनी कोयत्याने फिर्यादी यांचेवर वार करून त्यांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला म्हणून तक्रार दिलेने वरील प्रमाणे गुन्हा दाखल आहे.. सदर गुन्हा दाखल गुन्हयातील आरोपींचा पोलीस उप निरीक्षक श्री अशोक येवले, तपास पथकातील स्टाफ असे मा. मंगल मोढवे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक व मनोजकुमार लोंढे पोलीस निरीक्षक, बिबवेवाडी पोलीस ठाणे पुणे यांचे मार्गदर्शनाखाली आरोपीचा शोध घेत असताना पोलीस अमंलदार सुमित ताकपेरे, आशिष गायकवाड, ज्योतिष काळे यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहिती वरून तपास पथकातील आधिकारी व अमंलदार यांनी आरोपी नामे १) धिरज ग्यानोबा कोकरे, वय २० वर्षे रा. युग्म कॉम्प्लेक्स, सर्व्हे नं.६२९/५, फ्लॅट नं.०९, पापळ वस्ती रोड, बिबवेवाडी पुणे. मुळ- मु.हसनाळपदे, पो.पाळा, ता. मुखेड, जि. नांदेड २) कुमार तुळशीराम भागवत, वय २५ वर्षे रा.सव्र्व्हे नं.१०/११, तुळजा भवानी मंदिरा जवळ, सुखसागरनगर कात्रज पुणे. ३) शुभम संजय धोत्रे, वय २७ वर्षे रा.सव्र्व्हे नं.१३/बी, १०/बी/३, संभाजीनगर धनकवडी पुणे. यांना ताब्यात घेवून त्यांचेकडे तपास करता त्यांनी दाखल गुन्हयातील फिर्यादी यास जुन्या भांडणाचे कारणावरून कोयत्याने वार केल्याचे निष्पन्न झालेने त्यांना गुन्हयात अटक करून त्यांचेकडून एक लोखंडी कोयता हस्तगत करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री अमितेशकुमार, मा. सह पोलीस आयुक्त श्री रजनकुमार शर्मा, मा.अप्पर पोलीस आयुक्त श्री मनोज पाटील, मा. पोलीस उप आयुक्त श्री आर राजा, परिमंडळ ५ पुणे शहर, मा. सहा. पोलीस आयुक्त श्री गोडसे, वानवडी विभाग पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगल मोढवे, पोलीस निरीक्षक गुन्हे श्री मनोजकुमार लोंढे तपासपथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उप निरीक्षक श्री अशोक येवले, पोलीस हवालदार संजय गायकवाड, संतोष जाधव, पोलीस अमंलदार सुमित ताकपेरे, आशिष गायकवाड, प्रणय पाटील, शिवाजी येवले, विशाल जाधव, ज्योतिष काळे, अभिषेक धुमाळ, यांनी केली आहे.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!