युनिट 05 गुन्हे शाखा यांची कारवाई उच्चभ्रू सोसायटीमध्ये घरफोडी करणा-या आरोपीकडून 11,59,500/ रुपये कि.चा मुद्देमाल जप्त


पंकेश जाधव संपादक 7020794626

गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर 

महा पोलीस न्यूज़ ! ऑनलाईन पुणे :- दि.25/11/2024 रोजी हडपसर पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलींग करीत असताना पोलीस अंमलदार तानाजी देशमुख व अमित कांबळे यांच्या बातमीदांमार्फत बातमी मिळाली की, हडपसर पोलीस स्टेशन येथे दिनांक 22/11/2024 रोजी मार्वेला आर्को सोसायटी, हडपसर मध्ये झालेल्या घरफोडीमधील आरोपी नामे अनिल मिनसिंग खडका सद्या रा. माळवाडी, हडपसर व मुळचा नेपाळ हा चोरीचे सोन्याचे दागिने विकण्याकरीता अमरधाम स्मशानभुमी माळवाडी या ठिकाणी येणार आहे. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने त्यांनी सदरची बातमी वरिष्ठांना कळवुन लागलीच स्टाफसह बातमीचे ठिकाणी रवाना झालो.

अमरधाम स्मशानभुमी माळवाडी या ठिकाणी आरोपी अनिल मिनसिंग खडका,वय 25 वर्षे, रा.केशव चौक, यश हॉस्पीटलचे शेजारी, माळवाडी, हडपसर, पुणे हा संशयित रित्या आजुबाजुस पाहत स्मशानभुमीच्या दिशेने आल्याने त्यास युनिट 05 चे पथकाने सापळा रचुन शिताफीने पकडले. सदर आरोपी हा त्यास पकडल्यापासुन त्याचे पॅन्टच्या खिशामध्ये हात घालुन काहीतरी लपविण्याचा प्रयत्न करीत होता. त्याबाबत पोलीसांनी त्याचेकडे चौकशी केली असता, त्याने मार्वेल आर्को सोसायटीमधील एका फ्लॅटमध्ये सोन्याचे दागिने चोरी केले असुन ते दागिने मी विकण्याकरीता आलो आहे असे सांगितले. त्यानंतर पोलीसांनी त्यांची अंगझडती घेवुन त्याचेकडे मिळुन आलेले सोन्याचे एकुण ग्रॅम 173.500 वजनाचे एकुण 11,59,500/- रु.किं.चे सोन्याचे दागिने असा हडपसर पोलीस स्टेशन गु.र.नं. 1784/2024 भारतीय न्याय संहिता सन 2023 चे कलम 305 (अ) मधील मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपी अनिल मिनसिंग खडका याने हडपसर पोलीस स्टेशन हद्दीत घरफोडी चोरीचा गुन्हा केल्याचे निष्पन्न झालेले आहे. त्यास हडपसर पोलीस स्टेशन यांचे ताब्यात पुढील कार्यवाहीकरीता देण्यात आलेले आहे.

सदरची कामगिरी मा.अपर पोलीस आयुक्त,गुन्हे श्री.शैलेश बलकवडे,मा.पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री.निखील पिंगळे, मा.सहायक पोलीस आयुक्त श्री.राजेंद्र मुळीक यांचे सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे युनिट 05 गुन्हे शाखा,पुणे शहर कडील पोलीस निरीक्षक श्री.युवराज हांडे,सपोनि विजयकुमार शिंदे, पोलीस अंमलदार, अमित कांबळे, तानाजी देशमुख, प्रमोद टिळेकर, प्रताप गायकवाड, विनोद निंभोरे, विनोद शिवले, स्वाती गावडे, पल्लवी मोरे, शुभांगी म्हाळसेकर, अकबर शेख, राहुल ढमढेरे यांचे पथकाने केली


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!