धक्कादायक घटना ! बोपदेव घाट कोंढवा येथे महाविद्यालयीन तरुणीवर केले सामुदायिक बलात्कार…..


पंकेश जाधव संपादक 7020794626

महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अत्यंत गंभीर प्रकार समोर आला आहे. मित्रासह बोपदेव घाटात फिरायला गेलेल्या २१ वर्षीय तरुणीवर तीन जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची खळबळ घटना समोर आली आहे. ही घटना साधारणपणे गुरुवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. गंभीर जखमी असलेल्या मुलीला तिच्या मित्राने रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयातून पोलिसांना याबाबत माहिती कळविण्यात आल्यानंतर याप्रकरणी पुढील कारवाईला सुरुवात करण्यात आली.

पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही मुलगी परराज्यातील आहे. ती २१ वर्षांची असून या ठिकाणी असलेल्या एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. ती आणि तिचा मित्र गुरुवारी रात्री अकरा वाजता सुमारास बोपदेव घाटामध्ये गेले होते. त्यावेळी तीन अज्ञात तरुणांनी त्यांना अडवले. जबरदस्तीने या मुलीला ताब्यात घेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला आणि तिचा मित्राला मारहाण करण्यात आली. ज्या ठिकाणी ही घटना घडली ते ठिकाण निर्मनुष्य आहे.

पोलीस ठाण्याला साधारणपणे शुक्रवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास या संदर्भात रुग्णालयाकडून माहिती कळविण्यात आली. आरोपींचा शोध सुरू करण्यात आला आहे. गुन्हे शाखेच्या आणि पोलीस ठाण्याच्या तपास पथकाला सूचना करण्यात आल्या असून त्यांची पथके देखील आरोपींच्या शोधार्थ रवाना करण्यात आलेली असल्याचे सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी सांगितले.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!