चंदननगर पोलिस स्टेशन तपास पथकाची दमदार कामगिरी ! सराईत आरोपीस पिस्टल, काडतुसासह केले अटक…


पंकेश जाधव संपादक 7020794626

चंदननगर पोलीस स्टेशन पुणे शहर

महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन पुणे:– दि.०६/१०/२०२४ रोजी चंदननगर पो.स्टे कडील तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळपे, पोलीस अंमलदार श्रीकांत कोद्रे, सुरज जाधव, शेखर शिंदे असे पोलीस स्टेशन हद्दीत कर्तव्यावर असताना पोलीस अंमलदार श्रीकांत कोद्रे, पोलीस अंमलदार सुरज जाधव यांना त्यांचे गोपनिय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, रेकार्डवरील आरोपी नामे समाधान लिंगाप्पा विभुते वय ३२ वर्षे रा. मु पो पळशी सुपली ता. पंढरपुर जि. सोलापूर हा चंदननगर पोलीस स्टेशनचे हददीमध्ये सुंदराबाई शाळा येथे पिस्टल विक्री करण्यासाठी येणार आहे अशी माहिती मिळाल्यानंतर, त्यांनी सदरची बातमी पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळपे यांना कळविल्यानंतर, मा वरिष्ठाचे मार्गदर्शनाखाली वरील अधिकारी व पोलीस अंमलदार हे सुदंराबाई शाळा येथे सापळा रचुन थांबले असता, रेकार्डवरील आरोपी समाधान विभुते हा दुचाकीसह आला असता, त्याला पोलीस उभे असल्याची चाहुल लागताच तो पळुन जावु लागल्याने पोलीसांनी त्याला सिनेस्टाईलने पाठलाग करुन दुचाकीसह ताब्यात घेतला असता, त्यांच्याकडील असलेल्या काळया रंगाच्या सॅकबॅगमध्ये देशी बनावटीचे पिस्टल व बॅगमधील एका छोटया प्लास्टीकच्या पिशवीमध्ये पितळी धातुची प्रत्येकी २५/- रु.कि.ची एकुण ५ पितळी धातुची के एफ ७.६५ ची काडतुसे मिळुन आले आहे. सदर आरोपीकडुन ९५,०००/- रु. कि. चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. त्याचे विरूद्ध पोलीस अंमलदार सुरज जाधव यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली असुन चंदननगर पो.स्टे गु.र.न ५१०/२०२४, भारतीय हत्यार अधिनियम कलम ३(२५), महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१) (३), १३५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन त्यास अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळपे, चंदननगर पोलीस स्टेशन हे करीत आहे.

सदरची कामगिरी ही पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ४ श्री. हिम्मत जाधव, सहा. पोलीस आयुक्त, येरवडा विभाग प्रांजली सोनवणे, यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अनिल माने, चंदननगर पो.स्टे. पुणे शहर, तपास पथक प्रभारी अधिकारी सपोनि दत्तात्रय लिगाडे, पो, उप. निरीक्षक राहुल कोळपे, पोलीस अंमलदार रामचंद्र गुरव, विश्वनाथ गोणे, नानासाहेब पतुरे, महेश नाणेकर, सचिन रणदिवे, शिवाजी धांडे, श्रीकांत कोद्रे, सुरज जाधव, शेखर शिंदे, विकास कदम, प्रफुल मोरे, नामदेव गडदरे, सचिन पाटील, अमोल जाधव यांनी केली आहे


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!