भीक मागण्याचा बहाना करुन उघड्या दरवाजावाटे घरात घुसुन सोने व रोख रक्कम चोरी करणा-या आरोपींना चंदननगर पोलीसांनी केले जेरबंद…


पंकेश जाधव संपादक 7020794626

चंदननगर पोलीस स्टेशन पुणे शहर

महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- चंदननगर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर- २४६/२०२४, भादवि कलम ३८०, प्रमाणे उघड्या दरवाजावाटे घरात घुसुन सोने व रोख रक्कम चोरी झालेबाबत दाखल असलेल्या गुन्हयामधील आरोपींचा व चोरीस गेले मालाचा तपास पथकाचे अधिकारी सपोनि खांडेकर व तपास पथकातील अंमलदार यांचेसह चंदननगर पोलीस स्टेशन हद्दीत शोध घेत होते. चोरीच्या अनुषंगाने चंदननगर, लोणीकंद व येरवडा, लोणीकंद व विश्रांतवाडी पोलीस ठाणे हद्दीतील एकुण १५० ते २०० सीसीटी व्ही कॅमेरांची पाहणी तसेच तांत्रीक विश्लेषणाद्वारे प्राप्त सी सी टी व्ही फुटेजमधील वर्णनाच्या लाल रंगाचे चारचाकी टेम्पोसारख्या गाडीचा व चोरी करणारे महिला व इसम यांची माहिती प्राप्त झाली होती.

दि.१९/०८/२०२४ रोजी सपोनि खांडेकर हे तपास पथकातील अंमलदार यांचेसह चंदननगर पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रालिंग करत होते त्याच दरम्यान पोहवा ६६१५ नाणेकर यांना त्यांचे गोपनीय बातमीदाराकरवी बातमी मिळाली की, मागील दोन/तीन महिन्यापुर्वी पैसे व सोने चोरी करणारे फुटेजमधील वर्णनासारख्या महिला व इसम हे आळंदी देवाची येथे एका लाल रंगाचे चारचाकी टेम्पोसारख्या गाडीसह उभे आहे. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने तपास पथकाकडील अंमलदार व महिला स्टाफ असे बातमीचे ठिकाणी रवाना होवुन आडबाजुस थांबुन पाहणी केली असता बातमीतील वर्णनाप्रमाणे महिला व इसम हे तेथे दिसल्याने त्यांना पोलीस असल्याची चाहुल लागताच ते पळुन जावु लागले पोलीसांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना शिताफीने ताब्यात घेवुन त्यांना त्यांचे नाव पत्ता विचारले असता त्यांनी त्यांची नावे १) कुमेश कांतीलाल पवार, रा. सावदरवाडी, वांगा ता. परांडा जि. उस्मानाबाद २) मिली दिपक पवार, वय-२० वर्षे, रा. आडगाव नाका, झोपडपट्टी, पंचवटी, नाशिक असे असल्याचे सांगितले. त्यांचेकडे असलेल्या महिंद्रा ईम्पेरिओ तिचा आरटीओ नं एमएच/४३ बीबी/१३३५ या गाडीबाबत विचारपूस करता त्यांनी दोघांनीही उडवाउडवीची उत्तरे दिल्याने त्यांना पुढील कार्यवाही करीता चंदननगर पोलीस स्टेशनला आणुन त्यांची अंगझडती घेतली असता त्यांचेकडे सोने व पैसे मिळून आल्याने त्यांना सदर सोने व पैशांबाबत विचारपूस करता ते उडवाउडवीची उत्तरे देऊ लागल्याने त्यांना विश्वासात घेवून अधिक विचारपूस केली असता त्यांनी सांगितले कि, सदरचे सोने व पैसे हे आम्ही दि.१८/०८/२०२४ रोजी सकाळी १०/०० वाजता सुमारास टिंबर मार्केट, पुणे येथे एका घरातून चोरी

केले असलेबाबत सांगितल्याने सदरबाबत खडक पोलीस स्टेशन अभिलेखावर पाहणी केली असता, खडक पो. स्टे पुणे शहर गुन्हा रजि. नंबर २७६/२०२४ भारतीय न्याय संहीता २०२३ चे कलम ३०५ प्रमाणे गुन्हा दाखल असल्याचे दिसून आले. तसेच त्यांचेकडे चंदननगर पोलीस स्टेशन गु र नं २४६/२०२४ भा.दं.वि कलम ३८० या गुन्हया बाबत अधिक चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा हा मागील ३ महिन्यापुर्वी केल्याची कबुली दिल्याने त्यांना ताब्यात घेवुन त्यांचेकडुन ३५,००,०००/- रू किंमतीचे ५२ तोळे वजनाचे वेगवेगळ्या प्रकारचे सोन्याचे दागिने तसेच २६,६००/- रू रोख रक्कम, व ५,५०,०००/- रू किंमतीची महिंद्रा ईम्पेरिओ कंपनीची लाल रंगाची चारचाकी गाडी असा एकुण ४०,७६,६००/- (चाळीस लाख, शहात्तर हजार सहाशे) रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

सदरची कामगिरी ही मा. मनोज पाटील सोा., अपर पोलीस आयुक्त पुर्व विभाग पुणे शहर, मा. हिम्मत जाधव सोो, पोलीस उपआयुक्त परीमंडळ ४ पुणे शहर, मा. प्रांजली सोनवणे, सहाय्यक पोलीस आयुक्त येरवडा विभाग पुणे शहर, यांनी दिलेल्या सुचने प्रमाणे मा. संजय चव्हाण, वरीष्ठ पोलीस निरीक्षक साो, चंदननगर पो.स्टे. पुणे शहर, मा. अनिल माने, पोलीस निरीक्षक (गुन्हे) साो, चंदननगर पो.स्टे. पुणे यांचे मार्गदर्शनाखाली सहा पोलीस निरीक्षक सिद्धनाथ खांडेकर, पोलीस अंमलदार, महेश नाणेकर, सचिन रणदिवे, शिवाजी धांडे, प्रफुल्ल मोरे, सचिन पाटील, विकास कदम, अमोल जाधव, शेखर शिंदे, नामदेव गडदरे, सुरज जाधव, श्रीकांत कोद्रे, ज्ञानोबा लहाने, शितल वानखेडे, पुजा डहाळे, मनिषा पवार, यांनी केली आहे.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!