बिबवेवाडी पोलीसांनी सराईत वाहनचोरट्यास अटक करून वाहनचोरी व फसवणुकीचे असे तिन गुन्हे उघडकीस आणून तिन वाहने जप्त केली.


पंकेश जाधव संपादक 7020794626

बिबवेवाडी पोलिस स्टेशन पुणे शहर 

महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- सदरबाबत अधिक माहिती अशी की, दि. १६/०९/२०२४ रोजी सायं ०५.०० वा. चे दरम्यान फिर्यादी यांनी त्यांचे प्रशांत टीव्हीएस शोरूम बिबवेवाडी पुणे येथे समोर ८०,०००/- रु. एक ग्रे, रंगाची टीव्हीएस आय क्यु नावाची दुचाकी आर टी ओ पांग नसलेली तिचा चॅसी MD626AM19R1H21937 व इंजिन नं AN1RHD009956 अशी असलेली सन २०२४ चे मॉडेल असलेली ही लॉक व पार्क करुन ठेवली केली असता फिर्यादी यांचे शोरुम मध्ये चौकशी करीता आलेल्या अनोळखी इसमाने ती चोरुन नेली आहे फिर्यादी यांनी तक्रार दिलेने बिबवेवाडी पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं.२५२/२०२४ भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखल आहे.

दाखल गुन्हयातील अज्ञात आरोपीचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर साळुंखे व पोलीस निरीक्षक गुन्हे मनोजकुमार लोंढे, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक श्री अशोक येवले, तपासपथकातील अमंलदार यांनी गुन्हयाचे घटनाठिकाणी भेट देवून सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीचे मोडस वरून पोलीस अमंलदार आशिष गायकवाड, संजय गायकवाड, शिवाजी येवले व सुमित ताकपिरे यांना त्यांचे बातमीदारांकडून मिळालेल्या बातमीवरून दाखल गुन्हयातील रेकॉर्डवरील आरोपी विश्रुत भालचंद्र नवाथे, वय ४० वर्षे रा.१०४ मल्हार बिल्डींग, कल्पतरू सोसायटी कॅनाल रोड, कर्वेनगर पुणे. यास दिनांक २३/१०/२०२४ रोजी अटक करून त्याचेकडे दाखल गुन्हयाबाबत अधिक तपास करता त्याने दाखल गुन्हा केल्याचे कबुल केले. त्याचेकडे गुन्हयाचे तपासामध्ये त्याचेकडून १) बिबवेवाडी पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं.२५२/२०२४ भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम ३०३(२) २) अलिबाग पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं.१९६/२०२४ भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम ३१८(४) ३) म्हसवड पो. ठाणे गुन्हा रजि.नं.३०३/२०२४ भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम ३१८(४),३१६ (२) असे एकूण ०३ गुन्हे उघडकीस आलेले असून त्याचेकडून एकूण २,८०,०००/-कि.रू च्या एकूण एक इलेक्ट्रीक टीव्हीएक व दोन अॅक्टीव्हा जप्त करण्यात आहेत.

दाखल गुन्हयाचा पुढील तपास पोलीस हवालदार संजय गायकवाड हे करीत आहेत.

सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री अमितेशकुमार, मा. सह पोलीस आयुक्त श्री रंजनकुमार शर्मा, मा.अप्पर पोलीस आयुक्त श्री मनोज पाटील, मा. पोलीस उप आयुक्त श्री आर राजा, परिमंडळ ५ पुणे शहर, मा. सहा. पोलीस आयुक्त श्री धन्यकुमार गोडसे, वानवडी विभाग पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री शंकर साळुंखे, पोलीस निरीक्षक गुन्हे श्री मनोजकुमार लोंढे, तपासपथकातील अधिकारी पोलीस उप निरीक्षक श्री अशोक येवले, पोलीस हवालदार संजय गायकवाड, संतोष जाधव, पोलीस अमंलदार आशिष गायकवाड, शिवाजी येवले, सुमित ताकपेरे, विशाल जाधव यांनी केली आहे.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!