आचारसंहितेचा भंग करुन गावठी कट्टा जवळ बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराच्या खराडी पोलीसांनी आवळल्या मुसक्या…


पंकेश जाधव संपादक 7020794626

खराडी पोलिस स्टेशन पुणे शहर 

महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दि.१२/११/२०२४ रोजी खराडी पोलीस स्टेशनचे पोलीस उप-निरीक्षक राहुल कोळपे, पोलीस हवालदार महेश नाणेकर, अमोल भिसे, पोलीस अंमलदार प्रफुल्ल मोरे, अमोल जाधव, सुरज जाधव, श्रीकांत कोद्रे असे खराडी पोलीस ठाणेच्या हद्दीत खाजगी वाहनाद्वारे विधानसभा निवडणूक २०२४ चे अनुषांगने गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलींग करत असताना पोलीस अंमलदार सुरज जाधव व श्रीकांत कोद्रे यांना त्यांचे खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, रेकॉर्डवरील आरोपी नामे आदित्य अतिश मोहिते वय-२१ वर्षे रा. रामवाडी, येरवडा पुणे हा खराडी पोलीस स्टेशनचे हद्दीमध्ये ईवॉन आय.टी. पार्क, फेज-२, खराडी, पुणे येथे पिस्टल घेवून येणार आहे, अशी माहिती मिळाल्यानंतर श्री संजय चव्हाण वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खराडी पो. स्टे यांनी लगेच मिळालेली बातमी वरिष्ठांना कळविली असता त्यांनी कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर बातमीचे ठिकाणी सापळा रचुन त्याला पकडण्यासाठी गेले असता त्याला पोलीस आल्याची चाहुल लागताच तो तेथून पळून जाऊ लागला असता पोलीसांनी त्याचा पाठलाग करुन त्याला शिताफीने पकडले व त्याची अंगझडती घेतली असता त्याचे कंबरेला पँटचे आतून गावठी कट्टा लावल्याचे व पॅन्टचे उजवे खिशात दोन राऊंड ठेवल्याचे दिसल्याने ते पोलीसांनी ताब्यात घेतले व त्याला अटक केली आहे. आरोपीने पिस्टल व जिवंत राऊंड कोठून व कशासाठी आणले? तो कोणाचा घातपात करणार होता का? याबाबतचा अधिक तपास वैशाली तांगडे महिला पोलीस उप-निरीक्षक खराडी पो. स्टे पुणे शहर या करत आहेत.

सदरची कामगिरी ही मा. मनोज पाटील अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर मा. हिम्मत जाधव, पोलीस उपआयुक्त, परिमंडळ ४, पुणे शहर, मा. प्रांजली सोनवणे, सहा. पोलीस आयुक्त, येरवडा विभाग यांचे मार्गदर्शनाखाली श्री संजय चव्हाण वरिष्ठ पोलीस निरीक्षक खराडी पो.स्टे. पुणे शहर, सपोनि / सिध्दनाथ खांडेकर, तपास पथक प्रमुख पोलीस उप-निरीक्षक राहुल कोळपे, महिला पोलीस उपनिरीक्षक वैशाली तांगडे, पोलीस अंमलदार महेश नाणेकर, अमोल भिसे, सचिन घोलप, प्रफुल मोरे, अमोल जाधव, सचिन पाटील, श्रीकांत कोद्रे, व सुरज जाधव, यांनी केली आहे.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!