नागपूर मध्यवर्ती कारागृह,नागपूर कारागृहातील बंदी बनणार उद्योजक बाबत चर्चात्मक मार्गदर्शन शिबीर संपन्न
पंकेश जाधव संपादक 7020794626
नागपूर मध्यवर्ती कारागृह , नागपूर
महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- मा. श्री प्रशांत बुरडे, अपर पोलीस महासंचालक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे व मा. श्रीमती स्वाती साठे, कारागृह कारागृह उपमहानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, पूर्व विभाग, नागपूर यांच्या मार्गदर्शनाखाली कारागृहातील बंद्यांना व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण तसेच उद्योगक्षम बनविण्यासाठी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एम.सी.ई.डी.) नागपूर, यांचे सौजन्याने लघु उद्योजक घडविणारे प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे.
उद्योग व्यावसाय हे तीन प्रकारचे असतात १) सेवा २) व्यापार ३) उद्योग.कारागृह अधीक्षक श्री. वैभव सु.आगे यांनी बांद्याना मार्गदर्शन करतांना व्यवसाय निर्माण करणारे उद्योजक बना,त्यासाठी उद्योजकता व ते विकास करण्याची क्षमता प्रथम आपल्यामध्ये निर्माण करा त्याच बरोबर,एका इच्छित ध्येयाप्रति कार्यप्रवणता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावे असे आव्हान केले.
विभागीय अधिकारी तथा केंद्र प्रमुख एम.सी.ई.डी. नागपूर चे श्री. एच. आर. वाघमारे यांनी बंद्यासाठी उपलब्ध असलेल्या शासनाच्या विविध योजना, विविध प्रशिक्षण कार्यक्रम या विषयी मार्गदर्शन केले. प्रकल्प अधिकारी श्री.श्रीकांत कुलकर्णी यांनी पी.पी.टी. द्वारे विविध उपक्रम, योजना, शासनाचे अनुदान, प्रेरणादायी स्लाईड च्या माध्यमातून मार्गदर्शन केले. सदरील चर्चा सत्र च्या अंती बंदिबांधव यांचे कडून आलेल्या प्रश्नावलीनुसार सकारात्मक निराकरण करण्यात आले. सदरील महत्वपूर्ण बंदी बनणार उद्योजक मार्गदर्शन शिबिरात ३१० बंदिबांधव उपस्थीत होते.
या सर्व कार्यक्रमाची रुपरेषा व नियोजन आराखडा कारागृह अधीक्षक श्री. वैभव आगे यांनी तयार केला होता. या कार्यक्रमासाठी प्रयास- टाटा सामाजिक विद्यान संस्थान मुंबई चे सामाजिक कार्यकर्ते श्री.धनपाल मेश्राम, श्रीमती मीना लाटकर, यांनी विशेष सहकार्य केले.
या कार्यक्रमास कारागृह अधीक्षक श्री.वैभव सु.आगे, वरिष्ठ तुरूंगाधिकारी, श्री. आनंद पानसरे, श्री. एच. आर. वाघमारे,विभागीय अधिकारी तथा जिल्हा उद्योजकत विकास केंद्र प्रमुख,नागपूर श्री. श्रीकांत कुलकर्णी, जिल्हा प्रकल्प अधिकारी, श्रीमती करुणा शेंडे, जिल्हा प्रकल्प अधिकारी, श्री.पंकज ठाकरे, जिल्हा प्रकल्प अधिकारी, श्रीमती सुषमा चौरपगार,श्रीमती नीलिमा उईके , श्रीमती स्वाती बगाडे, नेहा गंगभोज, श्री लक्ष्मण साळवे हे उपस्थित होते.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

