खुनाचा प्रयत्न या गुन्हयामध्ये पाहिजे असलेल्या आरोपीतास युनिट ६ पथकाने घेतला ताब्यात
पंकेश जाधव संपादक 7020794626
युनिट ६ गुन्हे शाखा, पुणे शहर
महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दि.२३/११/२०२४ रोजी गुन्हे शाखा युनिट ६ हद्दीमध्ये प्रभारी पोलीस निरीक्षक श्री. वाहिद पठाण, पोलीस उप-निरीक्षक रामकृष्ण दळवी, पोलीस अंमलदार रमेश मेमाणे, ऋषीकेश ताकवणे, सचीन पवार, गणेश डोंगरे असे युनिट हद्दीत विधानसभा निवडणुक निकाल २०२४ च्या अनुशंगाने गस्त करत असताना लोणीकंद पो.स्टे. गु.र.नं. १०७०/२०२४, भा.न्या.सं. कलम १०९ (४), ११८(२), ११८(१),१८९(१), १९१(२), १९१ (३), १९० मधील पाहिजे आरोपी नामे आर्य अनुपसिंग ठाकुर, वय २० वर्षे, रा. निओ सिटी, फेज १, बिल्डिंग सी, फ्लॅट नं. ४०७, जेएसपीएम कॉलेज चे पाठीमागे, बकोरी, पुणे हा जेएसपीएम कॉलेज, वाघोली येथे आला असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर ठिकाणी जावुन त्यास ताब्यात घेण्यात आले. नमुद आरोपीताकडे चौकशी करून लोणीकंद पोलीस ठाणे येथे खात्री केली असता नमुद गुन्हयात पाहिजे आरोपी असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास पुढील तपासकामी लोणीकंद पोलीस स्टेशन, पुणे शहर यांचे ताब्यात दिले आहे.
सदरची कामगीरी मा. अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. शैलेश बलकवडे, मा. पोलीस उप- आयुक्त (गुन्हे) श्री. निखिल पिंगळे, मा. सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. राजेंद्र मुळीक गुन्हे शाखा, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट ६ चे प्रभारी पोलीस निरीक्षक श्री. वाहिद पठाण, सहा. पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस उप-निरीक्षक रामकृष्ण दळवी, पोलीस अंमलदार रमेश मेमाणे, बाळासाहेब सकटे, सुहास तांबेकर, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, ऋषीकेश ताकवणे, सचिन पवार, ऋषीकेश व्यवहारे, गणेश डोंगरे, शेखर काटे, नितीन धाडगे, प्रतिक्षा पानसरे, किर्ती मांदळे यांनी केली आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

