गुन्हे शाखा युनिट ४ ची दमदार कामगिरी ! घरफोडी करणाऱ्या आरोपीस केले जेरबंद….
पंकेश जाधव संपादक 7020794626
गुन्हे शाखा युनिट ४ पुणे शहर
महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- आज रोजी युनिट-४ कडील पथक खडकी पोलीस स्टेशन येथे पेट्रोलिंग करीत असताना स.पोलीस फौजदार प्रवीण राजपूत व पोलिस अमलदार सुभाष आव्हाड यांना मिळालेल्या बातमीवरून आठ दिवसापूर्वी धानोरी येथे घरफोड्या करणारा मंजू पाटील हा आठ मुळा रोड, येथे मासाहेब हॉटेल समोर एका दुचाकी वर बसून कोणाची तरी वाट पाहत आहे.
अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने लगेच स्टाफ सह रवाना झालो इसम नामे मंजू पाटील याला ताब्यात घेऊन त्यांच्या कडे विचारपूस केली असता आठ दिवसापूर्वी धानोरी येथे बंद घरामध्ये चोरी केली असल्याबाबत त्यांनी सांगितले त्याच्याकडून 50 हजार रुपये कॅश व गुन्हा करताना वापरलेली एक दुचाकी (किंमत एक लाख) सदर व्यक्तीकडून मुद्देमाल जप्त केला आहे त्या बाबत विश्रांतवाडी पोलीस स्टेशन पोलीस स्टेशन येथे माहिती घेतली असता cr no. 380/ 2024 भा.न्या.स कलम 331(1),331(4),305 (अ) व cr.no 382/24 न्या.स कलम 331(1),331(4),305 (अ) प्रमाणे दोन गुन्हे दाखल असल्याचे समजले सदर इसमाने गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने पुढील कारवाई करता विश्रांतवाडी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

