गंभीर दुखापत करुन जबरी चोरी करणा-या व २ महीन्या पासुन फरार आरोपीस गुन्हे शाखा युनिट ६ ने केले जेरबंद
पंकेश जाधव संपादक 7020794626
युनिट ६ गुन्हे शाखा पुणे शहर
महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दि.१४/०१/२०२४ रोजी पोलीस निरीक्षक, वाहिद पठाण, पोलीस अमंलदार बाळासाहेब सकटे, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, महिला पोलीस अमंलदार प्रतिक्षा पानसरे, चालक पोलीस अमंलदार सुहास तांबेकर, असे युनिट हद्दीत गुन्हे प्रतिबंधक गस्त करीत असताना पोलीस अमंलदार नितीन मुंढे यांना गोपनीय माहीती मिळाली कि, विमाननगर पोलीस स्टेशन पुणे शहर गुन्हा रजि. नंबर ५६६/२०२४, भारतीय न्याय संहिता कलम ११८(२),१८९(२), १९१(२),१९१(३),१९०,३०४, अन्वये या गुन्हयातील निष्पन्न पाहिजे आरोपी नामे रोहित ऊर्फ नरेश अवधुत हा सिल्वर ओक सोसा कल्याणीनगर पुणे येथे येणार असल्याची बातमी मिळाली.
सदर बातमी बाबत वरिष्ठांना कळवुन बातमी मिळाले ठिकाणी जावुन सापळा रचुन त्यास शिताफिने पकडुन सदर इसमास त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव रोहित ऊर्फ नरेश उत्तम अवधुत वय ३० वर्ष रा. रामवाडी सिधार्थनगर पुणे असे असल्याचे सांगीतले नमुद इसम हा निष्पन्न पाहिजे आरोपी असल्याचे खात्री करुन तपासकामी ताब्यात घेतले. नमुद आरोपीतास गुन्हयाचे पुढील तपासकामी विमाननगर पो.स्टे. यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगीरी मा. अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे पुणे शहर श्री. शैलेश बलकवडे, मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री. निखिल पिंगळे, मा. सहा. पोलीस आयुक्त गुन्हे २ श्री. राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली युनिट ६ गुन्हे शाखा प्रभारी पोलीस निरीक्षक श्री. वाहिद पठाण, पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी, पो.हवा. रमेश मेमाणे, बाळासाहेब सकटे, कानिफनाथ कारखेले, नितीन मुंढे, सुहास तांबेकर, पोलीस अमंलदार ऋषीकेश ताकवणे, सचिन पवार, ऋषीकेश व्यवहारे, बाळासाहेब तनपुरे, समिर पिलाणे म. पोलीस अंमलदार प्रतिक्षा पानसरे, यांनी केली आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

