गुन्हे शाखा, युनिट १ ची दमदार कामगिरी ! वाहनचोरी करणा-या दोन सराईताना अटक, ०९ गुन्हे उघडकीस..


जोसेफ नडेसन पुणे शहर प्रतिनिधी

गुन्हे शाखा, युनिट १ पिंपरी चिंचवड शहर

महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- मा. पोलीस आयुक्त श्री विनयकुमार चौबे साहेब यांनी पिंपरी चिंचवड आयुक्तालयाचे हद्दीत वाढत असलेल्या वाहन चोरी गुन्हयाचे अनुषंगाने गुन्हेगारांची माहीती मिळवुन कायदेशीर कारवाई करणेबाबत गुन्हे शाखांना आदेशीत केले आहे. गुन्हे शाखा युनिट १ चे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक सुहास आव्हाड त्यांचे अधिपत्याखालील पोलीस अधिकारी व अंमलदार असे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत वाहन चोरी करणारे गुन्हेगारांची माहीती घेत चिखली पोलीस स्टेशन गु.रजि.नं. ०९/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२), ३ (५) या गुन्ह्याचा तपास करीत असताना प्राप्त सी.सी.टि.व्ही फुटेज वरुन सदरचा गुन्हा हा रेकॉर्ड वरील सराईत गुन्हेगार १) रफिक उमर जमादार, वय ३७ वर्षे, रा. तुपेवस्ती, टोल नाक्या जवळ, मोशी, पुणे, २) निलेश मनोहर गायकवाड, वय ३० वर्षे, रा. गुरुकृपा हौसिंग सोसायटी, मोरेवस्ती, चिखली, पुणे यांनी केला असल्याचे निष्पन्न झाले होते.

नमुद आरोपीना अटक करुन आरोपीकडे अधिक तपास करता आरोपी यांनी पिंपरी चिंचवड व पुणे शहर परीसरातुन बुलेट, स्प्लेंडर, मोपेड अशा महागड्या दुचाकी मोटार सायकली चोरी करून विक्री करण्याकरीता चिंचवड येथील के. एस.बी. चौक व एम.आय.डी.सी ब्लॉक २ येथे लपवुन ठेवल्या असल्याचे उघड झाले. त्यानुसार श्रेणी पोलीस उप निरीक्षक शिवाजी कानडे यांनी लपवुन ठेवलेली ०१ बुलेट, ०२ स्प्लेंडर, ०५ मोपेड अशा एकुण ०८ मोटार सयाकली कि. रू. ६ लाख ५५ हजाराच्या हस्तगत करण्यात आल्या असुन एकुण ०९ गुन्हे उघडकीस आले आहेत. हस्तगत करण्यात आलेल्या मोटार सायकली बाबत अधिक तपास करता त्याबाब खालील प्रमाणे गुन्हे दाखल असल्याचे उघड झाले आहे.

१) चिखली पोलीस ठाणे गु. रजि. नं.०९/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२)
२) पिंपरी पोलीस ठाणे गु.रजि. नं. ५६२/२०२४ भा.दं.वि कलम ३७९
३) भोसरी पोलीस ठाणे गु. रजि. नं.१९९/२०२४ भादवि कलम ३७९
४) चाकण पोलीस ठाणे.गु.रजि. नं.०००३/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२)
५) शिवाजीनगर पोलीस ठाणे, पुणे शहर गु.रजि.नं. २४४/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२)
६) शिवाजीनगर पोलीस ठाणे, पुणे शहर गु.रजि. नं. २५०/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२)
७) निगडी पोलीस ठाणे गु.रजि. नं.६७१/२०२२ भा.दं.वि. कलम ३७९
८) चिखली पोलीस स्टेशन गु.रजि.नं. ७१४/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२)
९) चिखली पोलीस स्टेशन गु.रजि. नं. ६४९/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२)

सदरची कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त श्री विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त श्री शशिकांत महावरकर, अप्पर पोलीस आयुक्त श्री वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री संदिप डोईफोडे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे श्री विशाल हिरे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट १ चे पोलीस निरीक्षक सुहास आव्हाड, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक शिवाजी कानडे, पोलीस अमंलदार मनोजकुमार कमले, सोमनाथ बो-हाडे, महादेव जावळे, गणेश महाडीक, सचिन मोरे, प्रमोद हिरळकर, प्रमोद गर्जे, अजित रुपनवर, तुषार वराडे, तानाजी पानसरे यांनी केली आहे.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!