पुणे ख्रिश्चन फोरम च्या वतीने ख्रिस्ती समाजा च्या वतीने पिंपरी येथे निषेध आंदोलन.


पुणे ब्युरो चीफ-डॅनियल अॅनथोनी ७८९६२७३९४५

महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे: पुणे ख्रिश्चन फोरमच्या वतीने ख्रिस्ती समाजावर होत असलेल्या धर्मांतराच्या आरोपांविरोधात आज पिंपरी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे निषेध आंदोलन करण्यात आले.

Advertisement

फोरमने सरकारकडे मागणी केली आहे की, धर्मांतराच्या आरोपांची सत्यता तपासण्यासाठी एक स्वतंत्र चौकशी समिती स्थापन करावी. या समितीत उपजिल्हाधिकारी, सेवानिवृत्त न्यायाधीश आणि ख्रिस्ती समाजातील प्रतिनिधी यांचा समावेश असावा.

फोरमच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, वारंवार ख्रिस्ती प्रार्थना सभांवर आक्षेप घेतला जातो आणि खोट्या धर्मांतराच्या आरोपांमुळे समाजात गैरसमज पसरवले जात आहेत. नुकतेच पुण्यातील पवित्र नाम देवालयाजवळ आंदोलन करून ख्रिस्ती समाजावर आरोप करण्यात आले. पोलिसांनी अशा प्रकारच्या निषेध आंदोलनांना परवानगी का दिली, असा सवाल फोरमने उपस्थित केला आहे.

मुख्य मागण्या:-

✅ धर्मांतर चौकशी समिती स्थापन करावी.
✅ कोणत्याही धार्मिक स्थळी विनाकारण गोंधळ घालणाऱ्या समाजकंटकांवर कारवाई करावी.
✅ चर्चच्या परिसरात होणाऱ्या आंदोलनांवर बंदी घालावी.
✅ पोलिसांनी धर्मांतर संबंधित तात्काळ गुन्हा दाखल करून तर त्या आरोपाविषयी सखोल चौकशी अंती गुन्हा दाखल करावा.

फोरमने स्पष्ट केले की, ख्रिस्ती समाज हा शांतताप्रिय आहे आणि त्यांनी संविधानाच्या चौकटीत राहून कार्य केले आहे. भारतात कुठेही जबरदस्तीने किंवा आमिष दाखवून धर्मांतर झाल्याचा एकही सिद्ध झालेला गुन्हा नाही.
लव्ह जिहाद आणि जबरदस्तीने धर्मांतर विषयी कायदा करणेसाठी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जी सात सदस्यीय संशोधन समिती स्थापन केली आहे तशाच प्रकारची किंवा तत्सम समिती खरोखर धर्मांतर झाले आहे की नाही याची शहानिशा आणि सत्यता पडताळणी करणेसाठी देखील एक समिती नेमावी ज्यामध्ये रिटायर्ड न्यायाधीश उपजिल्हाधिकारी किंवा सहाय्यक पोलिस अधिकारी कायदेतज्ञ आणि एका ख्रिस्ती धर्मगुरूंचा समावेश असणारी समिती स्थापन करावी ती समिती खरोखर धर्मांतर झाले आहे का नाही किंवा उगाच किंवा इतर कारणाने खोटे आरोप केले आहेत याची पडताळणी करून जो निर्णय देईल तो सर्वांनी मान्य करावा.अशी मागणी पुणे ख्रिश्चन फोरमने केली आहे.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!