उरूळी कांचन पोलीसांनी शिंदवणे रोड येथे एका इसमाला अज्ञात आरोपीनी कोयत्याने वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केलेल्या आरोपीतांना अटक


बापूराव चौधरी पुणे प्रतिनिधी 

उरुळी कांचन पोलिस स्टेशन पुणे ग्रामीण 

Advertisement

महा पोलीस न्यूज! ऑनलाईन पुणे :- उरूळी कांचन पोलीस स्टेशन गुन्हा रजि.७८/२०२५ बी.एन.एस.११८ (२), ३५२,३ (५) अन्वये दाखल असुन सदर गुन्हयातील फिर्यादी व त्यांचा मित्र फिर्यादी यांचे पॅशन मोटार सायकल वरून भांडगाव ता. हवेली जि.पुणे येथे कंपनीमध्ये कामासाठी जात असताना सकाळी ०६:२५ वा.चे.सु !! फिर्यादी हे गाडी चालवत होते व फिर्यादी यांचे मित्र हे पाठीमागे बसले होते. त्यानंतर शिंदवणे ते उरूळी कांचन रोडने येत असताना सकाळी ०६:३० वा.चे सुमारास चिंतामणी वॉशींग सेंटर जवळ पाठीमागुन येणारे मोटारसायकल वरील बसलेल्या तिन अज्ञात इसमांपैकी मध्यभागी बसलेल्या इसमाने त्याचे हातातील उस तोडीच्या कोयत्याने फिर्यादी यांच्या डोक्यात डावे बाजुने अचानक वार केला त्यावेळी फिर्यादी यांनी त्यांची मोटार थांबविल असता ते आरोपी त्यांचे मोटार सायकलवरून शिवीगाळ करून पळुन गेले वगैरे मजकुर वरून उरूळी काचंन पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्हयामध्ये काहीएक धागादोरा नसताना उरूळीकांचन पोलीसांनी कौशल्यपुर्ण तांत्रिक तपास करून सदर गुन्हयातील आरोपी नामे १. समीर आसलम शेख, वय २५ वर्षे, २. चेतन सोमनाथ जाधव, वय १८ वर्षे ०६ महीने, आरोपी नं.३ नामे निगम उर्फ नॅगी जगदीश निशाद, वय १८ वर्षे, ११ महीने सर्व रा. लोणी काळभोर ता. हवेली जि.पुणे यांना गुन्हयाचे तपासकामी अटक करण्यात आली असुन ०२ आरोपी अद्यापपर्यत फरार आहेत अटक आरोपीकडे केलेल्या तपासात त्यांनी सदरचा गुन्हा हा यातील फिर्यादी हा त्याचे पत्नीस आरोपी सोबत फोनवर बोलु देत नसल्याचे कारणावरून व संशय घेत असल्याचे कारणावरून अटक आरोपीने त्यांचे इतर ०४ साथीदार यांनी मिळुन फिर्यादीस जिवे ठार मारण्याचा कट करून फिर्यादीस कोयत्याने वार करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने सदर गुन्हयास बी. एन. एस. कलम १०९,६१ (२) हे वाढीव कलम लावण्यात आले आहे.

सदर गुन्हयाचा तपास पोलीस अधीक्षक श्री. पंकज देशमुख सो, अपर पोलीस अधीक्षक श्री. गणेश बिरादार सो, उप विभागीय पोलीस अधिकारी, दौंड विभाग श्री. बापुराव दडस सो, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. शंकर पाटील यांचे नेतृत्वाखाली सहा. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगीरे, पो.हवा. अजित काळे, पो हवा. उध्दव गायकवाड, पो. कॉ. दिपक यादव, पो.कॉ. सुमित वाघ, पो. कॉ. अमोल खांडेकर पो. कॉ. अश्वजित मोहोड यांचे पथकाने केली आहे.
सदर गुन्हयाचा पुढील अधिक तपास सहा. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगीरे हे करीत आहे.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!