निंबाळकरवाडी येथे कुजलेल्या अवस्थेत मिळुन आलेल्या मयताची ओळख पटवुन, खुनाचा १२ तासाचे आतमध्ये उलगडा


प्रमोद बापू सावंत पुणे प्रतिनिधी
भारती विदयापीठ पोलीस स्टेशन, पुणे शहर
महापोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दिनांक ११/१०/२०२५ रोजी गुजर-निंबाळकरवाडी, कात्रज पुणे येथे गवतामध्ये एका इसमाची बॉडी कुजलेल्या व आळया पडलेल्या अवस्थेत मिळुन आल्याने लागलीच भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनकडील वरीष्ठ पोलीस निरीक्षक राहुलकुमार खिलारे व पोलीस स्टेशनकडील अधिकारी व अंमलदार यांनी घटनास्थळी जावुन पाहणी केली असता मयत इसमाचा कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी खुन झाल्याची खात्री झाली.
मा. वरीष्ठांचे सुचना व मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक राहुलकुमार खिलारे, पोलीस उप निरीक्षक निलेश मोकाशी व तपास पथकाचे अंमलदारांनी मयत इसमाचेबाबत घटनास्थळाजवळील रहीवाशी यांचेकडे तपास केला असता त्यांचेकडुन मयत इसमाचे नाव सद्दाम ऊर्फ सलमान शेख, अंदाजे वय ३५ ते ४० वर्षे, रा. गुजर निबाळकरवाडी, कात्रज पुणे असे असल्याचे निष्पन्न झाले. सदरबाबत भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गु.र.नं. ४६४/२०२५ भा.न्या.सं.क. १०३ (१) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला
दाखल गुन्हयातील अज्ञात आरोपीचा मा. वरीष्ठांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी पोलीस उप-निरीक्षक निलेश मोकाशी व पोलीस अंमलदार हे शोध घेत असताना गोपनीय बातमीदाराकडुन प्राप्त झालेल्या बातमीवरुन मयत इसमास त्याचा मित्र विक्रम चैठा रोतिया, वय ३२ वर्षे, रा. सणसनगर माळवाडी, निंबाळकरवाडी, कात्रज, पुणे याने जिवे ठारले मारले आहे अशी माहीती मिळाल्याने लागलीच त्याचा शोध घेतला असता तो गुजरवाडी भागात मिळुन आल्याने त्यास नमुद गुन्हयात दिनांक १२/१०/२०२५ रोजी अटक करण्यात आली आहे. वाखल गुन्हयाचा पुढील तपास सपोनि शेंडे हे करीत आहेत.
सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे श्री. राजेश बनसोडे, मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ २ पुणे शहर श्री. मिलींद मोहीते, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे श्री. राहुल आवारे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राहुल खिलारे यांचे सुचनाप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर शेंडे, पोलीस उप-निरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार सागर बोरगे, सागर कोंडे, सचिन सरपाले, विठठल चिपाडे, सौरभ वायदंडे, महेश बारवकर, मंगेश पवार, निलेश खैरमोडे, मंगेश गायकवाड, किरण साबळे, तुकाराम सुतार, संदीप आगळे, मितेश चोरमोले व अभिनय चौधरी यांनी केली आहे.

Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!