दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक दोन गुन्हे शाखेकडून दिवसा घरफोडी करणाऱ्या २ अट्टल आरोपींना अटक; ४ गुन्हे उघड!


 पंकेश जाधव मुख्य संपादक 7020794626
दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक दोन गुन्हे शाखा पुणे शहर 
​ महा पोलीस न्यूज ऑनलाईन पुणे :-  शहर: महाराष्ट्र राज्यात दिवसा घरफोडी करून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या दोन अट्टल आरोपींना पुणे शहर, गुन्हे शाखा, दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक – २ च्या जवानांनी मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले आहे. अटक केलेल्या आरोपींमध्ये एका विधी संघर्षित बालकाचा (Juvenile) समावेश आहे. या कारवाईमुळे पुणे शहर आणि रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्या अंतर्गत नोंद असलेले एकूण ४ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
​📝 अटक केलेल्या आरोपींची नावे:
​१. सुनील मल्हारी तलवारे (वय-३८ वर्ष, रा- केएसबी चौक, अजंठानगर, मज्जित जवळ, आकुर्डी)
 नोव्हेंबरमध्ये केले होते गुन्हे
आरोपी सुनील तलवारे आणि विधी संघर्षित बालक यांनी नोव्हेंबर महिन्यात पुणे शहर तसेच रायगड जिल्ह्यात दिवसा घरफोडीचे गुन्हे केले होते.
​🏛️ उघड झालेले गुन्हे:
​पथकाने केलेल्या तपासामुळे खालील चार पोलीस स्टेशनमधील घरफोडीचे गुन्हे उघड झाले आहेत:
​समर्थ पोलीस स्टेशन
खराडी पोलीस स्टेशन
​चंदननगर पोलीस स्टेशन
​महाड शहर पोलीस स्टेशन (जिल्हा रायगड)
​गुन्हे शाखेच्या या महत्त्वपूर्ण कामगिरीमुळे दिवसा घरफोडीच्या घटनांना आळा बसण्यास मदत झाली आहे. पुढील तपासासाठी दोन्ही आरोपींना समर्थ पोलीस स्टेशन येथील गु.र.नं. २५७/२०२५ भा. न्या. सं. कलम ३०५(१), ३३१(१), (३) अन्वये ताब्यात देण्यात आले आहे.
सदर कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, अप्पर पोलीस आयुक्त पंकज देशमुख साहेब, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे सो, सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक सो, वरिष्ठ पोलीस निरीक्षक छगन कापसे, यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी छबू बेरड, पोलीस उपनिरीक्षक संतोष तानवडे, सहाय्यक पोलीस फौजदार राजू पुणेकर, कैलास चव्हाण, दिनकर लोखंडे, राजेश लोखंडे, पोलीस हवालदार संतोष होले, गणेश लोखंडे, सुरेश जाधव, संदीप येळे, विक्रांत सासवडकर, विनायक येवले, प्रफुल मोरे यांनी केली आहे.

Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!