पर्वती पोलीस स्टेशन तपास पथकाची धडाकेबाज कामगीरी ! साडेतीन वषानतर उलगडले खुनाचे रहस्य…


पंकेश जाधव संपादक 7020794626

पर्वती पोलीस स्टेशन पुणे शहर 

महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- दिनांक १७/०८/२०२० रोजी दुपारी १४.०० वाजण्याच्या सुमारास निखील माने वय १९ वर्षे रा. जनता वसाहत गल्ली नंबर ८८ पर्वती, पुणे यांनी समक्ष पोलीस ठाण्यात येवून कळविले की, पर्वती टेकडीच्या वरील बाजूस जंगलामध्ये पडक्या पाण्याच्या टाकीजवळ तळजाई टेकडीकडे जाण्या-या रस्त्याच्या खालच्या बाजूस एका महिलेचे प्रेत पडलेले दिसत आहे. ते प्रेत कुजलेले असून त्या ठिकाणी भयंकर दुर्गंधी येत आहे. खबर मिळताच त्याठिकाणी तात्कालीन पोलीस पथक रवाना झाले. नमूद ठिकाणी अंदाजे ३० ते ३५ वर्षे वयाच्या एका महिलेचा कुजलेला मृतदेह मिळून आला. पोलीसांनी तात्काळ दखल घेवून अकस्मात मयत दाखल करून तपास सुरु केला. प्रेताचे पोस्टमार्टम केल्यावर मृत महिलेचा मृत्यू चेह-यावर व छातीवर गंभीर स्वरुपाच्या जखमा झाल्याने मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले होते.

मृत महिला वर्णन एक अनोळखी महिला वय अंदाजे ३० ते ३५ अंगावर काळया रंगाचा ब्लाउज व नारंगी रंगाचा परकर हातात काचेच्या बांगडया व पायाच्या बोटांमध्ये जोडव्या तसेच डाव्या हातावर सुरेखा असे मराठीत गोंदलेले.

याबाबत तात्कालीन पोलीसांनी अकस्मात मयत दाखल करुन तपास सुरु ठेवला होता. परंतू नमूद महिलेची ओळख त्यांना पटू शकली नाही. दिनांक ०७/१२/२०२३ रोजी याबाबत पर्वती पोलीस ठाण्यात रितसर खुनाचा गुन्हा दाखल करुन त्याचा तपास वपोनि पायगुडे हे करीत होते. त्यानंतर वपोनि पायगुडे यांनी वरिष्ठांच्या मार्गदशानाखाली पर्वती पोलीसांची चार पथके तयार करुन संपूर्ण महाराष्ट्रातील मिसिंग महिलांचे रेकॉर्ड अत्यंत बारकाईने तसेच प्रत्यक्ष जावून शहर तसेच ग्रामीण हद्दीतील पोलीस स्टेशन्स येथे तपासले असता या वर्णनाची महिला हि दिनांक १२/०८/२०२० रोजी घरातून निघून गेली व परत आली नाही म्हणून रोहन संतोष चव्हाण यांनी राजगड पोलीस ठाणे अंकित खेड-शिवापूर पोलीस आऊटपोस्ट येथे मिसींग तक्रार दाखल केल्याचे निष्पन्न झाले.

Advertisement

याबाबत पोलीस निरीक्षक खोमणे व तपास पथकातील अंमलदार यांनी त्यानंतर रात्रंदिवस पाठपुरावा करुन रोहन चव्हाण यांचेकडे अधिक चौकशी केली असता त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे व बातमीदारांच्या सहाय्याने कोणत्याही प्रकारचा तांत्रिक पुरावा उपलब्ध नसताना पारंपारिक पध्दतीने तपास करुन एका संशयीत इसमास ताब्यात घेतले. त्याच्याकडे अत्यंत हुशारीने चौकशी करता त्याने त्याचे नाव सागर दादाहरी साठे वय २६ वर्षे रा. सुतारदरा, कोथरुड, पुणे मुळ रा. पाटील इस्टेट, गल्ली नंबर ०५, शिवाजीनगर, पुणे असे असल्याचे सांगून त्याने त्याच्या ओळखीची महिला नामे सुरेखा संतोष चव्हाण वय ३६ वर्षे रा. वेताळनगर, शिवापूरवाडा ता. हवेली. जि. पुणे हिचा तत्कालीन वादातून व पेशासाठी खून केल्याचे कबूल केल्याने पर्वती पोलीस स्टेशन गु.र. नं ३६८/२०२३ भादंवि कलम ३०२ मध्ये अटक करण्यात आली आहे.

नमूद गुन्हयात सर्वप्रथम तिची ओळख पटणे हे महत्वाचे होते तसेच मयत महिला तसेच

आरोपी यांचेबाबत काहीएक माहिती उपलब्ध नसताना पारंपारिक पध्दतीने पोलीस तपास करुन दोनच दिवसात पर्वती पोलीस ठाण्याच्या पथकाने वरील गुन्हा उघडकीस आणला आहे. पुढील तपास वपोनि पायगुडे हे करीत आहेत.

सदरची कामगीरी ही मा. अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग श्री. प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त परिमंडळ ३, श्री सुहेल शर्मा, सहायक पोलीस आयुक्त, सिंहगड विभाग आप्पासाहेब शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली व.पो.नि जयराम पायगुडे, पो.नि. गुन्हे विजय खोमणे, पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत कामठे, पोलीस अंमलदार राजू जाधव, कुंदन शिंदे, नवनाथ ‘भोसले, प्रशांत शिंदे, दयानंद तेलंगे, अंनिस तांबोळी, अमित सुर्वे, सद्याम शेख, ज्ञानेश्वर शिंदे, सुर्या जाधव यांनी केलेली आहे.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!