“हडपसर, वैदुवाडी भागात वाहनांची तोडफोड करून दहशत माजवणा-या टोळक्यास हडपसर तपास पथकाकडून तात्काळ अटक “


आकाश पांचाळ सह संपादक

हडपसर पोलीस स्टेशन पुणे शहर

महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- दिनांक १८/१२/२०२३ रोजी रात्रौ २२:१५ ते २२:३० वाजताचे सुमारास फिर्यादी तानाजी मारुती खिलारे, हे त्यांच्या राहत्या घरी असताना त्यांच्या परिसरात राहणारे मुलांनी हातामध्ये लोखंडी शस्त्रे घेवुन येवुन फिर्यादी यांच्या भावाचा मुलगा विश्वास गणेश खिलारे याने अनिकेत पाटोळे, रवि पाटोळे, आदित्य पाटोळे व इतर अनोळखी इसमाविरुध्द दिनांक १६/१२/२०२३ रोजी खडक पोलीस स्टेशन येथे दिलेल्या तक्रारीचा राग मनात धरुन फिर्यादी यांना लोखंडी शस्त्राने व दगडाने मारहाण करुन जखमी केले. तसेच घरासमोर पार्क मोटारसायकल व मोटार कारच्या काचा फोडल्या व इतर वस्तीमधिल ७-८ गाड्यांचे नुकसान केले, तसेच बेकरी व प्रोव्हिजन स्टोअर्सचे काउंटरच्या काचांची तोडफोड करुन त्यांचे नुकसान केले. आरोपींनी त्यांच्या हातातील लोखंडी धारदार शस्त्र हवेत फिरवत कोणाला ही सोडु नका आडवा येईल त्याला मारा, कोणी मध्ये आल्यास त्याला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. त्याबाबत हडपसर पोलीस स्टेशन गु.र.नं १९१५/२०२३ भादंवि कलम ३०७,३२४,४२७,१४३,१४४,१४५,१४८,१४९,५०४,५०६ सह महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ चे कलम ३७ (१), (३) सह १३५ प्रमाणे, आर्म अॅ. ४ (२५), क्रिमीनल लॉ अमेन्डमेन्ट अॅक्ट कलम ०३ व ०७ प्रमाणे गुन्हा दाखल गुन्ह्याचे गांभिर्य ओळखून रविंद्र शेळके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, हडपसर पोलीस स्टेशन, तपासपथक प्रभारी अधिकारी सहा पो. निरी विजयकुमार शिंदे, पोलीस उप-निरी. अविनाश शिंदे आणि तपासपथक अंमलदार यांनी आरोपींचा तात्काळ शोध घेवून आरोपी नामे १) अनिकेत रविंद्र पाटोळे वय २३ वर्ष २) आदीत्य रविंद्र पाटोळे वय २१ वर्ष ३) लखन बाळू मोहीते वय १९ वर्ष ४) तुषार बाळ मोहीते वय १८ वर्ष ५) हसनील अली सेनेगो वय १९ वर्ष ६) गौरव विजय झाटे वय १९ वर्ष ७) पंकज विठ्ठल कांबळे वय २१ वर्ष ८) ओंकार महादेव देडे वय २० वर्ष सर्व रा. वैदुवाडी / रामटेकडी हडपसर पुणे व ५ विधिसंघर्षीत बालक असे एकुण १३ जणांना अटक / ताब्यात घेण्यात आले आहे.

Advertisement

गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उप निरीक्षक महेश कवळे हे करीत आहेत,

सदरची कामगिरी ही श्री रितेश कुमार, मा. पोलीस आयुक्त सो पुणे शहर श्री. रंजनकुमार शर्मा साो, अप्पर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग व मा. आर राजा सो, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५ यांचे मागदर्शनाखाली मा. अश्विनी राख मॅडम, सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे, श्री. रविंद्र शेळके साो, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर, श्री. विश्वास डगळे सो, पोनि. (गुन्हे), श्री. संदीप शिवले सो, पोनि. (गुन्हे) यांचे सुचनाप्रमाणे तपास पथकाचे सहा पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे, पोलीस उप निरीक्षक अविनाश शिंदे, पोलीस अंमलदार, सुशील लोणकर, संदीप राठोड, समीर पांडुळे, जोतीबा पवार, सचिन जाधव, प्रशांत टोणपे, प्रशांत दुधाळ, निखील पवार, अतुल पंधरकर, भगवान हंबर्डे, सचिन गोरखे, अजित मदने, चंद्रकांत रेजीतवाड, अमोल दणके, कुंडलीक केसकर, रामदास जाधव, यांचे पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे.

 

(


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!