सोनाराच्या दुकानात सोने खरेदी करण्याच्या बहाण्याने दुकानात जावुन दुकानदाराची नजर चुकवुन सोन्याच्या चैन चोरी करणा-या आरोपीस सिंहगडरोड पोलीसांनी केले जेरबंद


पंकेश जाधव संपादक 7020794626

सिंहगडरोड पोलीस स्टेशन पुणे शहर 

महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- सदर बाबत अधिक माहिती अशी की, दि.२८/११/२०२४ रोजी सिंहगडरोड पोलीस स्टेशन हाद्दीतील वडगाव, धायरी भागातील सराफी दुकानामध्ये एका अनोळखी इसमाने मुलाचा व पत्नीचा वाढदिवस आहे असे सांगुन सोन्याची चैन खरेदी करण्याचा बहाणा करुन ती गळ्यात घालुन दुकानातुन दुकानदार यांची नजर चुकवुन सोन्याच्या चैन चोरी करुन घेवुन गेल्याने सिंहगडरोड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्हयाचा मा. पोलीस उप-आयुक्त साो, परिमंडळ ३ पुणे शहर व सहा. पोलीस आयुक्त साो, सिंहगडरोड विभाग पुणे याचे आदेशाने तपास पथकातील तपास पथकाच्या दोन टीम तयार करुन दाखल गुन्हयाचा तपास करत असताना, तपास पथकातील सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन निकम,पोलीस उप निरीक्षक, संतोष भांडवलकर, पोहवा २४६ तारु, पोशि ९१९१ क्षीरसागर, पोशि ०३ मोहीते यांना त्याचे गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सोनाराच्या दुकानात सोने खरेदी करण्याचे बहाण्याने दुकानात जावुन त्यांच्या दुकानातील चैन चोरी करणारा संशयीत इसम हा कोथरुड परिसरामध्ये आहे.

अशी बातमी मिळाल्याने सदरची बातमी मा. वरिष्ठांना कळविली असता मा. वरिष्ठांनी बातमीची खात्री करुन योग्यती कारवाई करण्याचे मुखजल आदेश दिल्याने मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी जावुन कोथरुड परिसरात संशयीत आरोपीचा शोध घेत असताना, दाखल गुन्हयातील अनोळखी इसम हा मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन त्यास त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्यांने त्याचे नाव कपिल जयराम चव्हाण वय ३९ वर्षे रा. मुळ मनवेलपाडा रोड महाकाली मंदीर, कारगिल नगर, विरार, इस्ट वसई पालघर मुंबई सध्या रा.घर नं ६ रामचंद्र स्मृती बिल्डींग, गाढवे कॉलनी शास्त्रीनगर कोथरुड पुणे असे असल्याचे सांगितल्याने त्यास सिंहगडरोड पो स्टे गुन्हा रजि.नं. ६९५/२०२४ बीएनएस २०२३ चे कलम ३०३ (२) या दाखल गुन्हयात दि.०२/१२/२०२४ रोजी रात्रौ २०.१० वा. अटक करुन त्याची पोलीस कस्टडी रिमांड घेवुन त्याचेकडे अधिक तपास केला असता त्याने सिंहगडरोड पोलीस स्टेशन, वारजे माळवाडी, चतुश्रृंगी पोलीस स्टेशन हद्दीतील सोनाराच्या दुकानात जावुन चैन चोरी केल्याचे सांगुन दाखल गुन्हयातील चोरीस गेलेल्या चैन त्याच्याकडुन हस्तगत करण्यात आल्या असुन खालील नमुद गुन्हे त्याने केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

१) सिंहगडरोड पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं. ६९५/२०२४ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३(२)
२) सिंहगडरोड पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं. ६९६/२०२४ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३(२)
३) चतुश्रृंगी पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं. ९५०/२०२४ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम
३०३(२)
४) वारजे माळवाडीपोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं. ४४९/२०२४ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम
२०४,३१९(२).३१८(४)

वरिल गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने पोलीस कस्टडी दरम्यान एकुण चार गुन्हयातील ५ सोन्याच्या चैनी व गुन्हा करताना वापरलेली एक दुचाकी असा एकुण ३,६४,४८०/-रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नमुद आरोपीस मा. न्यायालयाने न्यायलयीन कस्टडी रिमांड मंजुर केली आहे.

दाखल गुन्हयाचा पुढील अधिक तपास श्री. सचिन निकम, सहायक निरीक्षक हे करीत आहेत.

सदरची कामगिरी श्री अमितेश कुमार सो पोलीस आयुक्त पुणे शहर, श्री. रंजन कुमार शर्मा, पोलीस सह आयुक्त पुणे शहर, श्री. प्रविणकुमार पाटील सो, अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर श्री. संभाजी कदम सो, मा. पोलीस उप-आयुक्त परीमंडळ ३. पुणे शहर, श्री अजय परमार सोो, सहा पोलीस आयुक्त, सिंहगड रोड विभाग, पुणे शहर, श्री. दिलीप दाईगडे साो, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे शहर, मा. उत्तम भजनावळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सिंहगडरोड पोलीस स्टेशन पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक श्री सचिन निकम, पोलीस उप निरीक्षक, श्री संतोष भांडवलकर, पोलीस अंमलदार, संजय शिंदे, आण्णा केकाण, उत्तम तारु, पंकज देशमुख, देवा चव्हाण, अमोल पाटील, विकास पांडोळे, शिवाजी क्षिरसागर, राहुल ओलेकर, सागर शेडगे, स्वप्नील मगर, विनायक मोहीते, विकास बांदल, यांचे पथकाने केली.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!