“अवैध रित्या वास्तव्य करणा-या परकिय नागरिकांविरुध्द कारवाई”


पंकेश जाधव संपादक 7020794626

विशेष शाखा पिंपरी चिंचवड शहर

महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- पिपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये सांगवी पोलीस स्टेशन हद्दीत लक्ष्मीनगर पिंपळे गुरव भागात एक इराणी इसम टुरिस्ट व्हिसावर दिनांक २५/०१/२०१७ रोजी भारत देशामध्ये आला होता. त्याच्या पासपोर्टची वैधता दिनाक १८/०६/२०१८ रोजी संपलेली होती. सदर इसमास काल दिनांक २९/१२/२०२३ रोजी भारत देशातुन मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथुन त्याचे इराण देशामध्ये डिपोर्ट (हद्दपार) करण्यात आले आहे. अशाच प्रकारे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रामध्ये अवैधरित्या वास्तव्य करणा-या परकिय नागरिकांचा शोध घेवुन कार्यवाही करण्यात येत आहे.

Advertisement

सदरची कारवाई मा. विनय कुमार चौबे सो पोलीस आयुक्त, मा. डॉ संजय शिंदे सो.. पोलीस सह आयुक्त, मा.श्री वसंत परदेशी, अपर पोलीस आयुक्त, डॉ. शिवाजी पवार, पोलीस उप आयुक्त (विशेष शाखा), मा. सतिश माने, सहायक पोलीस आयुक्त (विशेष शाखा) यांचे मार्गदर्शनाखाली श्री नितीन लांडगे, पोलीस निरीक्षक, विशेष शाखा २ (परकीय नागरिक नोंदणी शाखा), श्री. रामचंद्र घाडगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सांगवी पोलीस ठाणे आणि परकीय नागरिक नोंदणी शाखेकडील पोलीस अंमलदार धनाजी पाटील, अक्षय घोडमारे, शरद तिखे व सांगवी पोलीस ठाणेकडील अंमलदार आर.बी. मिसे, आर.डी. साळुंके, ए.आर मोराळे, एन. के. शिंगोटे, एच. एम. लंगर यांनी केली आहे.

 

Gavar


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!