*पीडित मुलीची छेडछाड करून फरार असलेला आरोपी कोयत्यासह सरकार नगर पोलीस स्टेशन कडून अटक..


पंकेश जाधव संपादक 7020794626

सहकारनगर पोलीस स्टेशन, पुणे शहर

महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- दि. ३०/११/२०२३ रोजी रात्री १२.३० या सुमारास गुलमोहर अपार्टगेट बालाजीनगर धनकवडी पुणे येथे पिडीत मुलगी हिचे घराचे दार वाजवुन “तु गला आवडतेस, तु माझ्या सोबत रिलेशन मध्ये रहा” असे म्हणला असता फिर्यादी यांनी माझा हात गोड असे म्हणुन ओरडले असता त्याने हात पकडुन मारहाण केली तर दि. २७/१२/२०२३ रोजी फिर्यादी यांना पुन्हा रस्त्यात आडवुन “तु माझ्या सोबत रिलेशन मध्ये राहणार का नाही” असे विचारता नकार दिल्याने “तुला व तुझा घरच्यांना बघुन घेतो” अशी धमकी देयुन विनयभंग केला त्याबाबत आशीष उर्फ पंप्या श्रीकृष्ण राख वय १९ वर्षे रा. दत्त कृषा सोसायटी खुशबु हॉटेल मागे बालाजीनगर धनकवडी पुणे याचे वर सहकारनगर पोलीस ठाणे येथे गुरनं ३५५/२०२३ भा.द.वि. कलम ३५४,३२३,५०६ अगाणे गुन्हा दाखल आहे सदर गुन्हा करुन आरोपी फरारी होता.

Advertisement

दि. ०२/०१/२०२४ रोजी सहकारनगर पोलीस स्टेशन तपास पथकातील पोलीस अधिकारी च पोलीस अंमलदार असे सहकारनगर पोलीस वाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार अमोल पवार व निलेश शिवतरे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सदर बालाजीनगर येथे मुलीच्या छेडछाडीच्या गुन्हयांत फरार असलेला आरोपी पंप्या उर्फ आशीष राख हा कोयता सारखे हत्यार घेवुन राज लॉन्ड्रीचे पुढे सार्वजनीक रोडवर बालाजीनगर धनकवडी पुणे येथे काहीतरी गुन्हा करण्याच्या इरादयाने थांबला आहे अशी खात्रीशिर बातमी मिळाल्याने सदरची बातमी सहकारनगर पोलीस स्टेशन कडिल वरिष्ठांना कळविली असता त्यांनी लागलीच पो उपनिरी. राहुल खंडाळे व अंमलदार यांची टीम तयार करुन त्यांना सुचना व मार्गदर्शन करून बातमीचे ठिकाणी जावुन कारवाई करण्याचे तोंडी आदेश दिले त्यानुसार सहकारनगर पोलीस स्टेशन तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी बातमीचे ठिकाणी जावुन छापा टाकुन आरोपीस ताब्यात घेवुन नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव आशीष उर्फ पंप्या श्रीकृष्ण राख वय १९ वर्षे रा.दत्त कृपा सोसायटी पहीला मजला पलॅट नं.११ (के/ऑफ महेश शिंदे) गणेश मंदीरा जवळ गुरुदत्त सोसायटी खुशबु हॉटेल मागे बालाजीनगर धनकवडी पुणे असे सांगितले त्याची झडती घेता त्याचे कंबरेला एक लोखंडी कोयता मिळून आल्याने त्याच्यावर सहकारनगर पोलीस ठाणे येथे गुरनं ०३/२०२४ भारतीय हत्यारबंदी कायदा कलम ४ सह २५, महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) सह १३५, प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन त्याच्याकडे सहकारनगर पोलीस ठाणे येथे गुरनं ३५५/२०२३ भा.द.वि. कलम ३५४,३२३.५०६ दाखल गुन्हयाच्या अनुशंगाने विश्वासात घेवुन चौकशी करता त्याने सदरचा गुन्हा त्याने केल्याचे कबुल केल्याने त्यास सदर गुन्हयात अटक करण्यात आली आहे.

सदर आरोपी वर खुनाचा प्रयत्न, हत्यार बाळगणे अशा प्रकारचे एकुण ०२ गुन्हे बिबवेवाडी पोलीस स्टेशन येथे दाखल आहेत.

सदरची कामगीरी मा. अपर पोलीस आयुक्त सो पश्चिम प्रादेशीक विभाग श्री प्रविणकुमार पाटील. सोो, पोलीस उपायुक्त परिमंडळ-२, श्रीमती स्मार्तना पाटील सो, सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग नारायण शिरगावकर सोो, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळाळे, संदीप देशमाने पोलीस निरीक्षक (गुन्हे) सहकारनगर पोलीस स्टेशन यांचे मार्गदर्शनाखाली सहकारनगर पोलीस स्टेशन तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक राहुल खंडाळे, सहा. पोउपनिरी बापु खुटवड, पोलीस अंगलदार अगोल पवार, निलेश शिवतारे, बजरंग पवार, सुशांत फरांदे, भुजंग इंगळे, महेश मंडलिक, नवनाथ शिंदे, विशाल वाघ, सागर कुंभार, सागर सुतकर यांनी केली


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!