गुन्हे शाखा, यूनिट-३ कडून दोन तडीपार गुन्हेगारांवर कारवाई व सराईत गुन्हेगाराकडून एक पिस्टल व दोन राऊंड जप्त
पंकेश जाधव संपादक 7020794626
गुन्हे शाखा, यूनिट-३ पुणे शहर
महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- दि. १४/१२/२०२३ रोजी गुन्हे शाखा, युनिट ३, पुणे कडील सहायक पोलीस फौजदार संतोष क्षीरसागर यांना मिळाले बातमीवरून पोलीस अभिलेखावरील सराईत गुन्हेगार नामे अक्षय आनंदा चौधरी, वय २५ वर्षे, रा. मु. पो. नांदोशी, ता. हवेली, जि. पुणे यास कॅनोल रोडवरील हॉटेल विदर्भ समोर, वडगाव बु., पुणे येथे पकडून त्याचेकडून एक देशी बनावटीचे लोखंडी पिस्टल व दोन जिवंत राऊंड असा एकुण ४१,०००/- रू. किं. चा माल हस्तगत करण्यात आलेला आहे. नमुद आरोपीविरूध्द साईकुमार तुकाराम कारके, पोलीस शिपाई ८७३२, नेमणुक गुन्हे शाखा, युनिट-३, पुणे शहर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सिंहगड रोड पोलीस ठाणे येथे आर्म अॅक्टचा गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
आरोपी नामे अक्षय आनंदा चौधरी, वय २५ वर्षे, रा. मु. पो. नांदोशी, ता. हवेली, जि. पुणे याचेविरूध्द खुन, खुनाचा प्रयत्न, खंडणी यासारखे गंभीर गुन्हे नोंद आहेत.तसेच पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ ४ यांनी तडीपार केलेले लोणीकंद पोलीस ठाणेकडील अभिलेखावरील आरोपी नामे १) अमन उर्फ मुन्ना दस्तगीर पटेल, वय २३ वर्ष, रा. गाडेवस्ती, बकोरी फाटा, बी.जे. एस. कॉलेज शेजारी, वाघोली, पुणे, २) विशाल उर्फ इशाप्पा जगन्नाथ पंदी वय २२ वर्षे रा. मु.पो. बकोरी फाटा, रामचंद्र कॉलेजजवळ, वाघोली, पुणे यांना पकडून त्यांचेविरूध्द महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १४२ प्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे.
सदरची कामगिरी ही, मा. पोलीस आयुक्त, श्री रितेश कुमार, पुणे शहर मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, श्री रामनाथ पोकळे, पुणे शहर मा. पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, श्री. अमोल झेंडे पुणे शहर मा. सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे-१, श्री. सुनिल तांबे पुणे शहर, यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-३ चे प्रभारी अधिकारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्रीहरी बहिरट, पोलीस उप- निरीक्षक अजितकुमार पाटील, पोलीस अंमलदार संतोष क्षिरसागर, शरद वाकसे, किरण पवार, संजिव कळंबे, सोनम नेवसे, सुजीत पवार, राकेश टेकावडे, सतीश कत्राळे, साईनाथ पाटील, साईनाथ कारके, ज्ञानेश्वर चित्ते, यांचे पथकाने केली आहे.
दाखल गुन्हयाचा पुढिल तपास संतोष क्षिरसागर, सहायक पोलीस उप-निरीक्षक, गुन्हे शाखा, युनिट ३, पुणे शहर हे करीत आहेत.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

