बंडगार्डन पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी ! दिघी पो स्टे हद्दीमध्ये गाड्याची तोडफोड करणारा तसेच वाहनचोरी करणारा विधिसंघर्षित बालक ताब्यात
पंकेश जाधव संपादक 7020794626
बंडगार्डन पोलिस स्टेशन पुणे शहर
महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- बंडगार्डन पोलीस स्टेशन हद्दीमध्ये तपास पथकातील अधिकारी पो उप निरी रविन्द्र गावडे व कर्मचारी पेट्रोलिंग करत असताना पो.शि. ज्ञाना बडे व मनोज भोकरे गोपनीय बातमीदाराच्या बातमीवरून माहिती मिळाली कि कि चोरी चे वाहन घेऊन एक इसम पाचबिल्डिंग ताडीवाला या ठिकाणी येणार आहे तरी सदर ठिकाणी सापळा रचून इसम नामे -( विधीसंघर्षित )रा – गुरुद्वारा लोहगाव पुणे यास ताब्यात घेऊन सोबत असलेल्या वाहनाबाबत विचारपूस असता सदर वाहन चोरी कल्याचे कबूल केले त्यानुसार
खालीलप्रमाणे गुन्हे उघड
1)बंडगार्डन पो स्टे गु र नं 206/23 भा द वि कलम 379
2)बंडगार्डन पो स्टे गु र नं 374/23 भा द वि कलम 379
3)खडकी पो स्टे गु.र.न 464/ 23 भा द वि कलम 379
4)दिघी पो स्टे गु र नं 661/23 भा द वि कलम 336, 427,34
सदर बालकास बालसुधारगृह येरवडा या ठिकाणी ठेवण्यात आले आहे
सदरची कारवाई अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम विभाग पुणे शहर प्रवीणकुमार पाटील साहेब, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 स्मार्तना पाटील मॅडम, साहाय्यक पोलीस आयुक्त लष्कर विभाग संजय सुर्वे सो, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बंडगार्डन संतोष पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रशांत भस्मे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गावडे, पो. हवा सुधीर घोटकुले, अनिल कुसाळकर, पो.शि ज्ञाना बडे, संजय वणवे, शिवाजी सरक, मनोज भोकरे यांचे पथकाने केली आहे…

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

