एम.आय.डी.सी भोसरी पोलीस स्टेशन तपास पथकाची दमदार कामगिरी पिंपरी !  गांजा विक्री करिता आलेल्या आरोपींना जेरबंद करुन त्यांचेकडुन ५ किलो ९९० ग्रॅम वजनाचा गांजा केला जप्त


पंकेश जाधव संपादक 7020794626

एम.आय.डी.सी भोसरी पोलीस स्टेशन पिंपरी चिंचवड शहर

महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- दि. २८/१२/२०२३ रोजी एम.आय.डी.सी भोसरी पोलीस स्टेशन तपास पथकातील पोलीस अंमलदार प्रविण मुळुक व भागवत शेप यांना एम.आय.डी.सी भोसरी पोलीस स्टेशन हद्दीत एक इसम वैशाली स्विट जवळ बो-हाडे वाडी मोशी पुणे या ठिकाणी गांजा विक्री करिता येणार असल्याची गोपनीय बातमी मिळाल्याने एम.आय.डी.सी भोसरी पोलीस स्टेशन कडील तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार हे सदर ठिकाणी सापळा रचुन थांबले असताना बातमी प्रमाणे मिळालेल्या वर्णनाचा इसम त्याचे कडील नारंगी पांढऱ्या रंगाचे के.टी.एम. गाडीवरुन काळया रंगाची बॅगमध्ये गांजा हा अंमली पदार्थ घेवुन विक्री करता आला असता त्यास शिताफीने पकडून त्यास त्याचे नाव विचारता त्याने त्याचे नाव मलीकजान शब्बीर बलगानूर, वय २४ वर्षे, रा. पुष्पाई हौसिंग सोसायटी, बिल्डींग नं. ए/२६, रुम नं.४०१, बाबासाहेब आंबेडकर वसाहत, सेक्टर नं. २२, निगडी पुणे असे सांगुन त्याचे कडुन ०२,९९,५००/- रुपये किंमतीचा एकुण ५ किलो ९९० ग्रॅम वजनाचा गांजा व ०१,२०,०००/- रुपये किंमतीची के टीएम. डयुक मो.सा. नं. एम.एच.१४ जे.डब्ल्यु ७८६० असा एकुण ०४,१९,५००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असुन यातील आरोपीस सदर गुन्हयात अटक करुन त्याची पोलीस कोठडी घेवुन त्याचा साथीदार नामे गुनानिधी रतन साह वय २९ वर्षे, गुलाबराव काळभोर चाळ नं. ३. रुम नं. ५ काळभोर नगर चिंचवड, पुणे मुळ पटुका साईपल्ली, बिजेपुर राज्य ओडीसा याचा शोध घेवुन त्यास सदर गुन्हयात अटक करण्यात आली आहे.

Advertisement

सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त, श्री विनयकुमार चौबे साो. मा. सह पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे सो. मा. अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी साो. मा. पोलीस उपायुक्त संदिप डोईफोडे सो, परि-०३. मा. सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. विवेक मुगळीकर साो. यांचे मार्गदर्शना खाली श्री राजेंद्र निकाळजे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एम.आय.डी.सी भोसरी पोलीस स्टेशन, सहाय्यक पोलीस निरीक्षक एस.एस. पांचाळ, पोलीस उप निरीक्षक आर. बी. पानसरे पोलीस अंमलदार चंद्रकांत गवारी, शरद गांधिले, संजय जरे, गणेश बोन्हाडे, राहुल लोखंडे, प्रविण मुळुक, भागवत शेप, अनिल जोशी, नितिन खेसे, विशाल काळे, अक्षय क्षिरसागर, यांनी केली आहे.

सदर गुन्हयाचा तपास एस.एस. पांचाळ सहा. पोलीस निरीक्षक एम.आय.डी.सी भोसरी पोलीस स्टेशन हे करत आहेत.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!