खुनाच्या प्रयत्नातील सराईत आरोपीस युनिट 4 चे ताब्यात
पंकेश जाधव संपादक 7020794626
गुन्हे शाखा युनिट ४ पुणे शहर
महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- आज दिनांक 05/01/24 रोजी युनिट 4 कडील पथक युनिट 4 चे हद्दीमध्ये गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार विनोद महाजन व संजय आढiरी,अमोल वाडकर यांना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, दि.27/12/2023 रोजी करुणा हाऊसिंग सोसायटी येरवडा येथे धारदार शस्त्राने मारून एकास गंभीर जखमी केले होते. सदर गुहण्यातील मुख्य आरोपी हा धरणगाव जिल्हा जळगाव येथे असल्याबाबत खात्रीशीर बातमी मिळाली . सदर पथकाने बेलदार मोहल्ला धरणगाव जिल्हा जळगाव येथे जाऊन आरोपीस ताब्यात घेतले. त्यास त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव समीर शब्बीर शेख वय 28 वर्ष राहणार जय जवान नगर मथुरा हॉस्पिटल च्या मागे येरवडा पुणे. असे असल्याचे सांगितले. त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने व त्याच्या साथीदारांने दि.27/12/2023 रोजी करुणा हाऊसिंग सोसायटी रोड येथे मारहाण करून धारदार शस्त्राने जखमी केल्याची कबुली दिली. त्याबाबत येरवडा पोलीस ठाणे येथे संपर्क करून माहिती घेतली असता गु.र. नं.865/2023 भादवि क. 307, 452 ,323, 504 ,506, 427 सह भारतीय हत्यार अधिनियम 1959 चे कलम 4/ 25 महाराष्ट्र पोलीस अधिनियम 37 (1 )135 क्रिमिनल अमेंडमेंट कलम 03 व 07 अन्वये गुन्हा दाखल आहे.
आरोपीवर यापूर्वी खालील गुन्हे दाखल आहेत.
1) येरवडा पोलीस स्टेशन. .803/2023 भादवी कलम 395
2) येरवडा पोलीस स्टेशन.774/2017 भादवी कलम 326
3) येरवडा पोलीस स्टेशन.118/2018 भादवी कलम 395,506(2)
4) येरवडा पोलीस स्टेशन.544/2019 भादवी कलम 392
5) येरवडा पोलीस स्टेशन.2137/2020 भादवी कलम 392
6) चंदन नगर पोलीस स्टेशन 22/2026 भादवि कलम 454, 457,380
7) विमानतळ पोलीस स्टेशन.17/2022 भादवि कलम 384. 386 व मोका सदर आरोपीची वैद्यकीय तपासणी करून त्यास पुढील कारवाई कामी येरवडा पोलीस स्टेशन यांचे ताब्यात रिपोर्टाने देण्यात आले आहे.
सदरची कारवाई मा. रामनाथ पोकळे अपर पोलीस आयुक्त गुन्हे, मा. अमोल झेंडे, पोलीस उपायुक्त ,गुन्हे, मा. सतीश गोवेकर, सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे-2 यांचे मार्गदर्शनाखाली सोमनाथ जाधव वरिष्ठ पोलिस निरीक्षक गुन्हे शाखा युनिट ४ , अंमलदार संजय अiडारी, विनोद महाजन ,प्रवीण भालचिंम,स्वप्निल कांबळे, अमोल वाडकर, विठ्ठल वावळ यांनी केलेली आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

