राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक क्र.१, पुणे या पथकाची उच्च प्रतीचे विदेशी मदय विक्री करणाऱ्यावर लोणावळा येथे कारवाई.


संपादक :- पंकेश जाधव 7020794626

महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- दि.०६/०२/२०२४ रोजी मा. आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य डॉ. श्री. विजय सुर्यवंशी सो. व मा. संचालक (दक्षता व अंमलबजावणी) श्री. प्रसाद सुर्वे सो. व मा. विभागीय उप- आयुक्त, पुणे विभाग श्री. धोमकर सो, अधीक्षक श्री. चरणसिंग राजपुत सो, उप-अधीक्षक श्री. सुजित पाटील सो, श्री. उत्तम शिंदे सो. व श्री. एस. बी. जगदाळे सो. यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. देवदत्त पोटे, निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक क्र.१, पुणे यांचे पथकाने अवैधपणे उच्च प्रतीचे विदेशी मदय बाळगुन विक्री हेतुने वाहतुक करतांना लोणावळा शहर हद्दीत, गोल्ड व्हॅल्ली रोडवर, द लगुना रिसॉर्टच्या जवळ, तुंगार्ली, ता. मावळ, जि. पुणे. या ठिकाणी कारवाई करुन महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ चे कलम 65 (अ, बी, डी, ई), 80, 81, 83 व 90 नुसार गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्यात आरोपी बापु विठ्ठल आहेर व सुनिल रामचंद्र कदम यांचे ताब्यातुन उच्च प्रतीच्या विदेशी मद्याच्या विविध बँडच्या 50 सिलबंद बाटल्या व वाहतुकीसाठी वापरलेले टाटा कंपनीचे काळया रंगाचे प्रवासी वाहन हॅरीअर क्र. एमएच 43 सी सी 9267 असा वाहनासह एकुण रु.23,15,330/- किंमतीचा दारुबंदी गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

Advertisement

सदर कारवाईत निरीक्षक बी विभाग श्री. विठ्ठल बोबडे सो. व निरीक्षक, तळेगाव दाभाडे श्री. संजय सराफ सो, व दुय्यम निरीक्षक श्री. बी. एस. घुगे व श्री. डी. एस. सुर्यवंशी तसेच जवान सर्वश्री सुरज घुले, जयराम काचरा, शाहिन इनामदार, मुकुंद पोटे, चंद्रकांत नाईक, शरद हांडगर यांनी सहभाग घेतला. सदर गुन्ह्याचा पुढील तपास भरारी पथक क्र. १, पुणे चे दुय्यम निरीक्षक श्री. बी. एस. घुगे हे करीत आहेत. तसेच अशा प्रकारे अवैध मद्याबाबत कोणास माहिती मिळाल्यास तात्काळ राज्य उत्पादन शुल्क, पुणे विभागाशी संपर्क साधावा असे जाहिर आवाहन करण्यात येत आहे.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!