येरवडा मध्यवर्ती कारागृह व महिला कारागृहातील बंद्यांसाठी मनोरंजनात्मक साहित्याचा निशुल्क पुरवठा करुन प्रशंसनिय उपक्रम राबविले


पंकेश जाधव संपादक 7020794626

येरवडा मध्यवर्ती कारागृह, पुणे.

महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- समता फाऊंडेशन, मुंबई या सेवाभावी संस्थेमार्फत सामाजिक बांधिलकी जपत येरवडा मध्यवर्ती कारागृह व महिला कारागृहातील बंद्यांसाठी विविध आजारावरील वैद्यकीय शिबिरे आयोजित करुन तसेच मनोरंजनात्मक साहित्याचा निशुल्क पुरवठा करुन प्रशंसनिय उपक्रम राबविण्यात येतात.

त्यानुसार येरवडा महिला कारागृहातील महिला बंद्यांसाठी समता फाऊंडेशन या संस्थेमार्फत रांगोळी, मेहंदी, चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये महिलांनी उत्स्फुर्त सहभाग नोंदविला होता. सदर स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा दिनांक ०६.०९.२०२४ रोजी श्री सुनिल ढमाळ, अधीक्षक येरवडा मध्यवर्ती कारागृह, पुणे यांचे उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी सदर स्पर्धेत प्राविण्य मिळविलेल्या महिला बंदयांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.

सदर उपक्रम मा. प्रशांत बुरडे (भा.पो.से) अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे व मा. डॉ. जालिंदर सुपेकर (भा.पो.से) विशेष पोलीस महानिरीक्षक (कारागृह) महाराष्ट्र राज्य पुणे यांचे संल्पनेतून व मा. श्रीमती. स्वाती साठे, कारागृह उपमहानिरीक्षक, पश्चिम विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला.

सदर कार्यक्रमास श्री. सुनिल एन ढमाळ, अधीक्षक, येरवडा मध्यवर्ती कारागृह, पुणे श्रीमती. पी पी कदम, अति. अधीक्षक, श्री. आनंदा एस कांदे, वरीष्ठ तुरुंगाधिकारी, श्रीमती. आर ए खिलारी, तुरुंगाधिकारी श्रेणी-०२, श्रीमती. पोर्णिमा पालोदकर, तुरुंगाधिकारी श्रेणी-०२, श्रीमती. ऋनाक्षी गवळी, शिक्षिका, समाता फाऊंडेशन या संस्थेचे प्रतिनिधी श्रीमती. रोहिणी नेमणार, सामाजिक कार्यकर्ता श्रीमती. हिना सय्यद व कारागृह महिला अधिकारी / कर्मचारी उपस्थित होते.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!