महाराष्ट्र राज्यातील सर्व बंदयांना ‘‘कम्युनिटी रेडीओद्वारे’’ माहिती व मनोरंजनाचा खजिना उपलब्ध
पंकेश जाधव संपादक 7020794626
महा पोलिस न्यूज़ ! ऑनलाईन पुणे :- महाराष्ट्र कारागृह विभागाचे ‘सुधारणा व पुनर्वसन’ हे ब्रीदवाक्य आहे. कारागृहातील बंद्यांच्या मानसिकतेत सकारात्मक बदल घडवून त्यांना गुन्हेगारी प्रवृत्तीपासून परावृत्त करण्याकरिता विविध प्रेरणात्मक उपक्रमाद्वारे बंद्यांच्या मानसिकतेत सकारात्मक बदल घडत असल्याचे निदर्शनास आल्याने राज्यातील सर्व कारागृहांमध्ये बंद्यांकरिता “कम्युनिटी रेडिओ” हा उपक्रम राबविणेकरिता शासन निर्णय दिनांक – ०२ सप्टेंबर २०२४ रोजी निर्गमित करण्यात आला.
महाराष्ट्र कारागृह विभागामध्ये सर्वप्रथम “कम्युनिटी रेडिओ” केंद्र येरवडा मध्यवर्ती कारागृह येथे प्रायोगिक तत्वावर दिनांक – ११.११.२०१४ रोजी सुरु करण्यात आले असून रेडीओ वायसीपी या उपक्रमाचे यश पाहून नागपूर/नाशिक/कोल्हापूर/तळोजा/ठाणे/अमरावती मध्यवर्ती कारागृह व भायखळा जिल्हा कारागृह येथे रेडिओ केंद्र सुरु करण्यात आलेले आहेत.
कारागृहातील भिंतीआडच्या बंदीस्त जगामध्ये बाहेरील जगाची माहिती असावी व बंदयांचे मनोरजंन व्हावे यासाठी महत्वाचे साधन म्हणुन “कम्युनिटी रेडिओ” हा उपक्रम बंद्यासाठी खूप महत्वाचा असून आता शासनाने राज्यातील सर्व कारागृहामध्ये सुरु करण्याचा निर्णय घेतलेला आहे. सदर उपक्रमाअंतर्गत स्थानिक कारागृहातील ज्या बंद्यांना आपली कला या माध्यमातून सादर करावयाची असेल अशा बंद्यांच्या सुप्त कलागुणाना प्रोत्साहन दिले जाते. या व्यतीरीक्त ठरावीक दिवशी बंद्यांची आवडती गाणी त्यांच्याकडून मागवून घेऊन व त्या बंद्यांचे नावाची घोषणा करुन ऐकवली जातात. यामुळे बंद्यांच्या आवडीची दखल कारागृह प्रशासनाकडून घेतली जाते ही बाब बंद्यांचे मनावरील ताण कमी होण्यास मदत होते तसेच “कम्युनिटी रेडिओ” उपक्रम बंद्यांना पुढील आयुष्यात यशस्वी व स्वावलंबी होण्यासाठी दिशादर्शक ठरत आहे. असे सकारात्मक बदल मागील ६ ते ७ वर्षापासून “कम्युनिटी रेडिओ” या उपक्रमामुळे निर्दशनास आल्याने ही सुविधा आता सर्व कारागृहात उपलब्ध करुन देण्यात आहे.
मा.श्री.प्रशांत बुरडे,अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक,कारागृह व सुधारसेवा,महाराष्ट्र राज्य,पुणे यांचे मार्गदर्शनाखाली व मा.श्री.डॉ.जालिंदर सुपेकर,विशेष पोलीस महानिरीक्षक (मुख्यालय),कारागृह व सुधारसेवा,महाराष्ट्र राज्य,पुणे यांचे सहकार्याने महाराष्ट्र राज्यातील सर्व कारागृहात “कम्युनिटी रेडिओ” केंद्र सुरु करण्यास कारागृह प्रशासन सज्ज झालेले आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

