देहुरोड पोलीस स्टेशन तपास पथकाची दमदार कामगीरी ! भारतीय चलनातील बनावट नोटा छापणारे देहूरोड पोलीस स्टेशन तपास पथका कडून अटक 


पंकेश जाधव संपादक 7020794626

देहुरोड पोलीस स्टेशन पिंपरी चिंचवड शहर 

महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- देहुरोड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दि.२५/०२/२०२४ रोजी देहूरोड पोलीसांना गुप्त बातमीदाराकडुन बातमी मिळाली एक इसम मुकाई चौक येथे भारतीय चलनातील बनावट नोटा वितरीत करण्याच्या उद्देशाने येणार आहे अशी माहिती मिळाली. गुप्त बातमीदाराने दिलेल्या बातमीच्या अनुषंगाने देहूरोड पोलीसांनी मुकाई चौकाकडुन आदर्शनगरकडे जाणाऱ्या रोडवर सापळा लावला असता बातमीच्या वर्णनाचा एक इसम होंडा शाईन मोटार सायकलवरून आला. इसम नामे ऋतीक चंद्रमणी खडसे, वय २२ वर्षे, रा. कंद पाटीलनगर नं.९ विठ्ठलवाडी, देहूगांव, पुणे याला त्याचे मोटार सायकलसह ताब्यात घेवुन त्याची दोन पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्याचे कब्जात भारयतीय चलानातील ५०० रुपये दराच्या १४० बनावट नोटा मिळुन आल्या त्याचे विरुध्द देहूरोड पोलीस स्टेशन गु.रजि. नं. ९३/२०२४ भा.दं. वि. कलम ४८९ (क) प्रमाणे गुन्हा दाखल करून त्याला दाखल गुन्ह्यात अटक केली. त्याचेकडे अधिक तपास केला असता त्याने त्याचेकडे मिळालेल्या बनावट नोटा भोसरी गावची हद्दीत, दिप लॉन्स जवळ, दिघी मॅक्झीन, ता. हवेली, जि. पुणे येथील गोडसे यांच्या गाळा नं. ०९ मध्ये छापत असल्याचे दाखविले सदर ठिकाणी देहूरोड पोलीसांनी छापा मारला असता सदर ठिकाणी ०४ इमस ऑफसेट प्रिंटींग मशिनवर बनावट भारतीय चलनातील नोटा छापताना मिळुन आले. सदर ठिकाणावरून ३०० बनावट नोटा, इंडीयन करंसी पेपरवर नोटांचे चित्र प्रिंट केलेले ११९७ पेपर, नोटा छापण्यासाठी लागणारी ऑफसेट प्रिंटींग मशिन, लॅपटॉप, प्रिंटर, पैसे मोजण्याची मशीन, इंडीयन करंसी पेपर, शाई, पेपर कटींग मशिन व इतर नोटा छापण्यासाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आलेले आहे. सदर ठिकाणी नोटा छापणारे इसम १) सुरज श्रीराम यादव, वय ४१ वर्षे, रा. ग्लोबल हाईटस, फ्लॅट नं. १०४, तनिष्क सोसायटी समोर, च-होली बुद्रुक, ता. हवेली, जि. पुणे (२) आकाश युवराज धंगेकर, वय २२ वर्षे, रा. विठ्ठलवाडी, विठ्ठल मंदीरामागे, वनसे शशिकांत यांची रूम, आकुर्डी, पुणे (३) सुयोग दिनकर साळुंखे, वय ३३ वर्षे, रा. दत्तवाडी, डिकॉस्टा यांची बिल्डींग, श्री मेडीकलच्या मागे आकुर्डी, पुणे (४) तेजस सुखदेव बल्लाळ, वय १९ वर्षे, रा. रामनगर कॉलनी चक्रपाणी वसाहत, नाईकवाडे यांची बिल्डींग, राम मंदीर शाळेजवळ, भोसरी, पुणे ५) प्रणव सुनिल गव्हाणे, वय ३० वर्षे, रा. मुक्ताई हाईटस, फ्लॅट नं. २०१, आळंदी रोड, भोसरी, पुणे हे मिळुन आले. अद्याप पर्यंत एकुण ०६ आरोपी अटक करण्यात आलेले आहेत.

Advertisement

अद्यापर्यंत एकुण ५००/- रुपये दराच्या भारतीय चलनाच्या बनावट ४४० नोटा आरोपींकडुन जप्त झाल्या असुन अर्धवट छापलेल्या ४७८४ बनावट नोटा व १००० करन्सी पेपर जप्त केलेले आहे.

प्रथमदर्शनी यातील आरोपी सुरेश यादव याने आलीबाबा या वेबसाईटवर स्वतःचे अकाउंट उघडुन त्या मार्फतीने चीन मधुन भारतीय करंन्सीचे पेपर ऑनलाईन मागविल्याचे दिसुन येत आहे आरोपींना ०७ दिवसांची पोलीस कोठडी मिळाली असुन पुढील सविस्तर तपास करण्यात येत आहे.

सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त साो, श्री. विनयकुमार चौबे सोो, मा. अपर पोलीस आयुक्त श्री. वसंत परदेशी साो, मा. पोलीसउपायुक्त परिमंडळ-२ बापू बांगर सो, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, देहुरोड विभाग श्री. घेवारे साो. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. नितीन फटांगरे, यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक आशिष जाधव, पो. हवा. बाळासाहेब विधाते, पोहवा प्रशांत पवार, पो.ना सुनिल यादव, पोलीस अमंलदार किशोर परदेशी, प्रशांत माळी, केतन कानगुडे, संतोष महाडीक, मोहसीन आत्तार, युवराज माने, विवेक मिसे, राजेंद्र चव्हाण, शुभम बावनकर, स्वप्नील साबळे, सागर पंडीत, निलेश जाधव यांनी सदरची उल्लेखनीय कामगिरी केली आहे.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!