फरासखाना पोलिस स्टेशन तपास पथकाची दमदार कामगिरी ! मौजमजा करण्यासाठी मोटारसायकल चोरणाऱ्या अट्टल चोरटयास केली अटक
पंकेश जाधव संपादक 7020794626
फरासखाना पोलिस स्टेशन पुणे शहर
महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे:- फरासखाना पोलीस स्टेशन हद्दीत वारंवार होणाऱ्या वाहन चोरीच्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक सो. प्रशांत भस्मे यांच्या आदेशाने दिनांक २२/०४/२०२४ रोजी तपास पथकातील पोलीस अंमलदार सहाय्यक पोलीस फौजदार रिजवान जिनेडी, पो.हवा ५८५३ दळवी, पो.हवा ६४४२ स्वामी, पो.शि ८८२३ माळवदकर, पो.शि ८८८५ कांबळे, पो.शि ९१९७ खुट्टे असे नेहरु चौक भाजी मार्केट भागात पेट्रोलींग करत होते. पेट्रोलींग करत असताना पोलीस अंमलदार वैभव स्वामी, प्रविण पासलकर, समिर माळवदकर, संदीप कांबळे हे वाहन चोरीच्या अनुषंगाने वारंवार सी.सी.टी.व्ही कॅमेरे चेक करत असल्याने सी.सी.टी.व्ही फुटेज मधील वर्णनाप्रमाणे एक मिळता-जुळता इसम नेहरु चौक, भाजी मार्केट येथे आला असलेबाबत पोलीस अंमलदार समीर माळवदकर यांना गोपनिय बातमीदारामार्फत माहीती मिळाल्याने पोलीस अंमलदार समिर माळवदकर, रिजवान जिनेडी, गणेश दळवी, वैभव स्वामी, प्रविण पासलकर, संदीप कांबळे, सुमित खुट्टे यांना बातमीदाराने सांगितलेल्या वर्णनाप्रमाणे एक इसम दिसुन आल्याने त्यास ताब्यात घेऊन फरासखाना पोलीस स्टेशन आणुन त्यास त्याने त्याचे नाव व पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव व पत्ता खंड् दिलीप चौधरी, वय-२३ वर्षे, रा-मु.पो. निदुर, साधनाथ मंदीराशेजारी, ता-निलंगा, जि-लातुर असे सांगितले. त्याच्याकडे अधिक चौकशी करता सदर इसमाने फरासखाना पोलीस स्टेशन हद्दीतील रविवार पेठ, नेहरु चौक भाजी मार्केट, मंडई परिसरातुन मोटारसायकली चोरी केल्याचे सांगुन चोरलेल्या दुचाकी मोटारसायकल त्याच्या मुळगांवी ठेवल्या असल्याचे कबुल केल्याने त्याच्या मुळगांवी जाऊन शिरुर आनंतपाळ पोलीस स्टेशनकडील स्थानिक पोलीस स्टेशनचे पोलीस अमलदार पो.हवा १३५६ एस.एस. शिंदे यांची मदत घेऊन फरासखाना पोलीस स्टेशनकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक, श्री. वैभव गायकवाड, पोलीस अंमलदार रिजवान जिनेडी, वैभव स्वामी, राकेश क्षीरसागर, प्रविण पासलकर, सुमित खुट्टे, समिर माळवदकर यांनी १३ दुचाकी मोटारसायकल जप्त केल्या आहेत. सदरचा आरोपी हा सन २०२१ पासुन वाहन चोरी करत असल्याचे दिसुन आले असुन सदरबाबत फरासखाना पोलीस स्टेशन येथे ७ गुन्हे, कोथरुड पोलीस स्टेशन २ गुन्हे, चर्तुः श्रृंगी पोलीस स्टेशन १ गुन्हा, विश्रामबाग पोलीस स्टेशन ३ गुन्हे असे एकुण १३ गुन्हयातील मोटारसायकल आरोपी खंडु दिलीप चौधरी, वय-२३ वर्षे, मु.पो. निदुर, ता-निलंगा, जि-लातुर याने चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त अमितेश कुमार सोो. मा. पोलीस सह आयुक्त, प्रविण पवार सोो. मा.अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर, श्री. प्रविणकुमार पाटील सोा., मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ-१ पुणे संदीपसिंह गिल, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त फरासखाना विभाग पुणे श्रीमती रुक्मिणी गलंडे यांचे यांचे मार्गदर्शनाखाली फरासखाना पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, प्रशांत भस्मे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री. अजित जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक, श्री. वैभव गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक, निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार रिजवान जिनेडी, समिर माळवदकर, राकेश क्षीरसागर, प्रविण पासलकर, वैभव स्वामी, सुमित खुट्टे, संदीप कांबळे, मेहबुब मोकाशी, प्रमोद मोहीते, गणेश आटोळे, शशीकांत ननावरे, तुषार खडके, अजित शिंदे यांच्या पथकाने केली आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

