एम.पी.डी.ए कारवाई केलेल्या आरोपीचे अवैध अग्नीशस्त्र व एक जिवंत काडतुस विधीसंघर्षीत बालका कडुन हस्तगत
पंकेश जाधव संपादक 7020794626
भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन पुणे शहर
महा पोलीस न्यूज ऑनलाईन पुणे :- दिनांक १६/०५/२०२४ रोजी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन कडील तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार पेट्रोलींग करीत असताना पोलीस अंमलदार मंगेश पवार, निलेश खैरमोडे यांना त्यांचे गोपनीय बातमीदारा मार्फतीने सच्चाईमाता, पाण्याचे टाकीजवळ, आंबेगाव खु, पुणे येथे एक विधीसंघर्षीत बालक, वय १७ वर्षे, हा त्याचे ताब्यात ५०,०००/- रुपये किंमतीचे एक गावठी बनावटीचे पिस्टल व ५००/- रुपये किंमतीचे १ जिवंत काडतुस असा एकुण ५०,५००/- रुपयांचे मुद्देमालासह मिळुन आल्याने त्याचे कडुन सदरचा मुद्देमाल हस्तगत करुन त्याचेविरुध्द भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ४०४/२०२४, भारतीय हत्यार अधिनियम कलम ३ सह २५ महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बालकाकडे केले तपासामध्ये त्याचेकडील पिस्टल व काडतुस हे त्याचा मित्र ऋषिकेश राजेंद्र बर्डे, रा. कात्रज, पुणे याने एम.पी.डी.ए कारवाई केल्यामुळे त्याचेकडे ठेवण्यासाठी दिले असल्याचे निष्पन्न झाले आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ २, श्रीमती स्मार्तना पाटील, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे श्रीमती नंदीनी वग्याणी, यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. डी. एस. पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शरद झिने, तपास पथकाचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर कदम, पोलीस उपनिरीक्षक धिरज गुप्ता, पोलीस अंमलदार मंगेश पवार, निलेश खैरमोडे, सचिन सरपाले, धनाजी धोत्रे, अवधतु जमदाडे, अभिनय चौधरी, सचिन गाडे, निलेश जमदाडे, शैलेश साठे, नामदेव रेणुसे, चेतन गोरे, महेश बारवकर, निलेश ढमढेरे, हनुमंत मासाळ, हर्षल शिंदे, विक्रम सावंत, राहुल तांबे, यांच्या पथकाने केली आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

