फुरसुंगी येथे दुकानाची व वाहनाची तोडफोड करुन दहशत निर्माण करणाखा आरोपीतांना हडपसर तपासपथकाकडून अटक


पंकेश जाधव संपादक 7020794626

हडपसर पोलिस स्टेशन पुणे शहर

महा पोलिस न्यूज़ ! ऑनलाईन पुणे :- दिनांक ३१/०५/२०२४ रोजी सांयकाळी ०६/०० वाजताचे सुमारास फिर्यादी योगेश दिंगबर बुधवंत वय २६ वर्षे धंदा व्यापार पत्ता- १६५, शिवसेना भवन जवळ माळवाडी हडपसर पुणे. यांनी त्याचे मालकिचे शंभु फॉर मेन्स, महाराष्ट्र बैंक शेजारी, पी.एम.टी. बस स्टॉप समोर, भेकराईनगर, पुणे या शॉपच्या बाहेर वडाच्या झाडाखाली बसण्यास विरोध केल्याने आरोपींनी त्या गोष्टीचा राग मनात धरुन बेकायदेशीर जमाव जमवून हातात लाकडी दांडके, लोखंडी धारदार शस्त्र घेवुन येवुन दुकानाचे काचा फोडून त्याचे नुकसान केले तसेच दुकानाच्या समोरील रोडवरुन जाणाऱ्या एका बसची काच फोडली व त्यानंतर त्यांनीच श्री तुकाराम नगरी अपार्टमेंन्ट ढमाळवाडी या सोसायटीच्या बाहेर पार्क केलेल्या ७ त ८ गाड्यांवर दगड मारुन गाडयांच्या काचा फोडून त्यांचे नुकसान करुन सदर भागात दहशत निर्माण केल्यावरुन हडपसर पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नंबर ८८६/२०२४ भा.द.वि. कलम १४३, १४४, १४५, १४८, १४९, ३३६, ४२७ सह भारतीय हत्यार कायदा कलम ४(२५), महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१) (३) सह १३५ क्रिमीनल लॉ अॅमेन्डमॅन्ट अॅक्ट कलम ३ व ७ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला होता.

Advertisement

दाखल गुन्ह्याचे गांभिर्य ओळखून श्री. संतोष पांढरे, वरिष्ठ पोलीस पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे व सुचनांप्रमाणे तपासपथक अधिकारी अर्जुन कदळे सहा. पोलीस निरीक्षक तसेच तपास पथक अंमलदार यांनी मिळून तपासाचे नियोजन केले. व घटनास्थळाचे आजुबाजुचे सी.सी.टी.व्ही. फुटेज तपासून तोडफोड करणाऱ्या आरोपीतांचे नावे निष्पन्न करुन तांत्रिक विश्लेषणाच्या व गुप्त बातमीदाराच्या आधारे व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे शोध घेवुन आरोपी नामे १) विजय ऊर्फ धनप्पा बसवराज कुरले वय २२ वर्षे रा. संजुदा कॉम्प्लेक्स समोर, पापडे वस्ती फुरसुंगी पुणे. २) माणिक नागेश सगर ऊर्फ वाढिव बबल्या वय १९ वर्षे रा. शिवतेज नगर लेन नं. ४, काळेपडळ फुरसुंगी पुणे. यांना फुरसुंगी हडपसर पुणे येथून दिनांक ३१/०५/२०२४ रोजी रात्री ताब्यात घेवुन, त्यांना अटक करण्यात आलेली आहे. सदर आरोपींना मा. न्यायालयासमक्ष हजर करण्यात आलेले असून मा. न्यायालयाने त्यांची गुन्ह्याचे तपासकामी ०७ दिवसांची पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केलेली आहे. तसेच अधिक तपासाअंती फुरसुंगी परीसरात राहवयास असलेले व नमुद गुन्ह्यात सहभाग असलेल्या, ०३ विधीसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेण्यात आलेले आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास श्री बापूसाहेब खंदारे, पोलीस उपनिरीक्षक, हे करित आहेत.

सदरची कामगिरी ही श्री अमितेश कुमार, मा. पोलीस आयुक्त साो पुणे शहर, श्री. प्रविण पवार, मा. पोलीस सह आयुक्त साो. पुणे शहर, श्री. मनोज पाटील, अप्पर पोलीस आयुक्त साो, पुर्व प्रादेशिक विभाग व मा. आर राजा, पोलीस उप आयुक्त साो., परिमंडळ ५ यांचे मागदर्शनाखाली मा. अश्विनी राख मॅडम, सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे, संतोष पांढरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर, मंगल मोढवे मॅडम, पोनि. (गुन्हे), उमेश गित्ते, पोनि. (गुन्हे), यांचे सुचनाप्रमाणे तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे, पोलीस उप निरीक्षक महेश कवळे, पोलीस अंमलदार, सुशील लोणकर, संदीप राठोड, समीर पांडुळे, सचिन जाधव, प्रशांत दुधाळ, निखील पवार, प्रशांत टोणपे, भगवान हंबर्डे, अजित मदने, अमोल दणके, चंद्रकांत रेजीतवाड, सचिन गोरखे, अमित साखरे, कुंडलीक केसकर, रामदास जाधव, अनिरूध्द सोनवणे, अमोल जाधव यांचे पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!