मोका गुन्हयात सात महीन्यापासुन फरारी असलेल्या आरोपीच्या गुन्हे शाखा, युनिट-०४ ने आवळल्या मुसक्या
पंकेश जाधव संपादक 7020794626
गुन्हे शाखा, युनिट-४, पुणे शहर.
महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दि. ३०/०५/२०२४ मा. श्री. गणेश माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा, युनिट ०४, पुणे शहर यांनी रेकॉर्डवरील गुन्हेगार, हिस्ट्रीशिटर, तडीपार, मोक्का गुन्हयातील पाहिजे आरोपी, स्टॅडिंग वॉरट मधील पाहिजे आरोपीतांचा शोध घेऊन मिळुन आल्यास पुढील कायदेशीर कारवाईचे व गंभीर गुन्हयांचा समांतर तपास करुन गुन्हे उघडकीस आणणे बाबत आदेश दिले. प्राप्त आदेशाप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक, वैभव मगदुम, पोलीस हवालदार अजय गायकवाड, पोलीस हवालदार जोशी, अंमलदार जहांगीर पठाण, व वैभव रणपिसे असे पेट्रोलिंग करीत असताना, पोलीस अंमलदार जहांगीर पठाण, व वैभव रणपिसे यांना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली की,” सुमारे सात महिन्यापुर्वी मारहाण करुन, दहशत करुन पळुन गेलेला इसम पापु ऊर्फे प्रणय गोगले हा आळंदी रोड, विश्रांतवाडी चौक, पुणे येथे थांबलेला असुन त्याने अंगामध्ये लाल रंगाचा टी शर्ट व राखाडी रंगाची पॅन्ट घातलेली आहे.” अशी खात्रीशिर बातमी मिळाली. बातमीप्रमाणे खात्री करुन आरोपी पापु ऊर्फे प्रणय विनोद गोगले, वय १९ वर्षे, रा. इंदीरानगर, हनुमान मंदिराशेजारी, खडकी पुणे यास ताब्यात घेऊन त्यांचेकडे प्राथमिक तपास करता, त्याने चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन गुरनं. ७५१/२०२३ भा.दं.वि. कलम ३०७, ३२३, १४१, १४३, १४४, १४७, १४८, १४९ सह क्रिनीनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट कलम ७ सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) सह १३५ व महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ चे कलम ३ (१) (ii), ३(२), ३(४) प्रमाणे त्याचे साथीदारांसह केला असल्याची कबूली दिली आहे. त्यास पुढील कायदेशीर कारवाईकरीता मा. सहाय्यक पोलीस आयुक्त सोा, खडकी विभाग, पुणे शहर यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची उल्लेखनिय कामगिरी मा. पोलीस आयुक्त सो श्री. अमितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त साो श्री. प्रविण पवार, मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे, श्री शैलेश बलकवडे, मा. पोलीस उप-आयुक्त गुन्हे श्री. अमोल झेंडे, मा. सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-२ श्री. सतिश गोवेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. गणेश माने यांचे मार्गदर्शनात युनिट ४ कडील पोलीस उपनिरीक्षक श्री. वैभव मगदुम, पोलीस अंमलदार अजय गायकवाड, एकनाथ जोशी, विठ्ठल वाव्हळ, हरिष मोरे, प्रविण भालचिम, संजय आढारी, जहांगीर पठाण, वैभव रणपिसे, भरत गुंडवाड, वैशाली माकडी, शितल शिंदे यांनीकेली आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

