बंद्याकरिता स्मार्ट कार्ड ॲलन दूरध्वनी” सुविधेचा मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अमरावती, श्री.देशपांडे यांचे हस्ते उदघाटन करण्यात आले
पंकेश जाधव संपादक 7020794626
अमरावती मध्यवर्ती कारागृह
महा पोलिस न्यूज़ ! ऑनलाईन पुणे :– आज दिनांक 14.06.2024 रोजी सकाळी 10.00 वाजता अमरावती मध्यवर्ती कारागृह येथे मा. अमिताभ गुप्ता, अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधार सेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या संकल्पनेतून तसेच माननीय डॉ. श्री. जालिंदर सुपेकर, विशेष पोलीस महानिरीक्षक (कारागृह) मुख्यालय, पुणे व मा. श्रीमती स्वाती साठे, कारागृह उपमहानिरीक्षक पूर्व विभाग, नागपूर यांचे प्रमुख मार्गदर्शनामध्ये बंद्याकरिता सुरू करण्यात आलेल्या “स्मार्ट कार्ड ॲलन दूरध्वनी” सुविधेचा मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अमरावती, श्री.देशपांडे सो व मा. जिल्हा व सत्र न्यायाधीश अमरावती, श्री.मनवर सो यांचे हस्ते उदघाटन करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे वेळी अमरावती मध्यवर्ती कारागृहाच्या अधीक्षक श्रीमती. कीर्ती चिंतामणी तसेच कारागृह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
कारागृहातील १३०० ते १४०० बंद्यांना स्मार्ट कार्डचा वापर करून “ॲलन दूरध्वनी” सुविधेचा आठवड्यातून ३ वेळा महिन्यातून १२ वेळा ६ मिनिटे ७२/- रु.मध्ये त्यांचे नातेवाईकांसोबत व वकिलांसोबत बोलता येणार आहे. सद्यस्थितीत ०७ “ॲलन दूरध्वनी” सुविधा बसविण्यात आलेल्या असून बंद्यांचा त्यांचे नातेवाईकांशी जास्त वेळ संवाद झाल्यामुळे त्यांचे मानसिक स्वास्थ्य चांगले राहण्यास नक्कीच मदत होईल व त्यामुळे बंद्यांमध्ये सकारात्मक बदल होऊन त्यांचे मनपरिवर्तन होईल. तसेच सदर ॲलन दूरध्वनी सुविधेचा लाभ 20 बंद्यानी घेतलेला असून सद्यस्थितीत 100 स्मार्ट कार्ड ऍक्टिव्ह करण्यात आलेले आहे व शिल्लक 700 कार्ड ऍक्टिव्ह करण्याचे काम प्रगतीपथावर आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

