पुण्यात भारी ! गुन्हे शाखा यूनिट ६ ची कामगिरी ! वाघोली येथील गणेश ज्वेलर्स फोडणारे सराईत गुन्हेगार चोरीचे वाहनांसह जेरबंद करून एकूण ५ गुन्हे उघड


पंकेश जाधव संपादक 7020794626

गुन्हे शाखा यूनिट ६ पुणे शहर

Advertisement

महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दिनांक २५/०७/२०२४ रोजी गुन्हे शाखा, युनिट ६ कडील पो. हवा. रमेश मेमाणे, पो.ना. नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, ऋषिकेश व्यवहारे, ऋषिकेश ताकवणे, शेखर काटे हे युनिट ६ च्या हद्दीमध्ये गुन्हे प्रतिबंधक गस्त करत असताना पोलीस नाईक नितीन मुंढे यांना त्यांचे बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, दि. १५/०७/२०२४ रोजी वाघोली येथे घरफोडीचा गुन्हा घडला होता सदर गुन्हयातील निष्पन्न आरोपी गुन्हे अभिलेखावरील आरोपी नामे हंसराज टाक व सनीसिंग जुनी हे लोणीकंद पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये वाघोली ते भावडी रोडवर भैरवनाथ मंदिराजवळ मोकळया मैदानात वाघोली, ता. हवेली, जि.पुणे येथे चोरीचे वाहनांसह थांबलेले आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदरची बातमी मा. वरीष्ठांना कळवली असता त्यांनी बातमीप्रमाणे जावून खातरजमा करून कारवाई करण्याचे आदेशित केल्याने सदर बातमीप्रमाणे जावुन खात्री केली असता सदर ठिकाणी दोन इसम संशयीतरीत्या थांबलेले दिसले आम्हाला पाहुन ते पळुन जावु लागल्याने त्यांना शिताफीने ताब्यात घेवुन त्यांना त्यांचे नाव पत्ता विचारता त्यांनी त्यांची नावे १) हंसराज उर्फ हंसु रनजितसिंग टाक, वय २० वर्षे, रा. तुळजाभवानी वसाहत, बंटर शाळेच्या पाठीमागे, कॅनॉलशेजारी, हडपसर, गाडीतळ, पुणे २) सनिसिंग जितेंद्रसिंग जुनी, वय २२ वर्षे, रा.सर्वे नं.११०, कोठारी व्हील्स शेजारी रामटेकडी, हडपसर, पुणे असे असल्याचे सांगितले. त्यांचे ताब्यातील दोन होंडा शाईन दुचाकींबाबत गुन्हे अभिलेख तपासले असता १) लोणीकंद पो.स्टे. गु.र.नं.६९३/२०२४, भा.न्या.सं. कलम ३०३ (२), २) येरवडा पो.स्टे. गु.र.नं.४३८/२०२४, भा.न्या. सं. कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हे नोंद असलेबाबत समजले. वरील नमुद आरोपींनी दि. १५/०७/२०२४ रोजी त्यांचे इतर साथिदारांसह इको गाडीसह येवुन वाघोली येथील गणेश ज्वेलर्स चे शटर उचकटुन घरफोडी केल्याची कबुली दिली आहे. वरील आरोपींपैकी हंसराज उर्फ हंसु रनजितसिंग टाक हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असुन त्याचेवर यापुर्वी दरोडा, घरफोडी, शरिराविरूद्धचे असे एकुण २५ गंभीर गुन्हे दाखल आहेत.

नमुद आरोपींकडुन उघडकीस आलेले गुन्हे खालीलप्रमाणे

१) लोणीकंद पोलीस स्टेशन गु.र.न. ६८४/२०२४ भा. न्या. सं. कलम ३३१ (४), ३०५
२) लोणीकंद पोलीस स्टेशन गु.र.न. ६५५/२०२४, भा. न्या. सं. कलम ३३१ (४),३०५ (अ) ३) लोणीकंद पोलीस स्टेशन गु.र.न. ६९३/२०२४, भा. न्या. सं. कलम ३०३(२)
४) येरवडा पोलीस स्टेशन गु.र.न. ४३८/२०२४, भा. न्या. सं. कलम ३०३(२)
५) देहुरोड पोलीस स्टेशन (पिंपरी चिंचवड) गु.र.नं. ३४५/२०२४, भा. न्या. सं. कलम ३०३ (२)

वर नमुद आरोपींकडुन दोन दुचाकी घरफोडी व एटीएम फोडीसाठी लागणारे साहित्य व हत्यारे असा एकुण ६५,०००/- रू. किमतीचा मुद्देमाल गुन्हयाचे तपासकामी जप्त करण्यात आलेला आहे.

सदरची उल्लेखनीय कामगिरी मा. पोलीस आयुक्त पुणे शहर श्री अमितेश कुमार, मा. पोलीस सह-आयुक्त पुणे शहर रंजनकुमार शर्मा, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, शैलेश बलकवडे, मा. पोलीस उपआयुक्त गुन्हे अमोल झेंडे, मा. सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे २ सतीश गोवेकर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट ६ चे पोलीस निरीक्षक उल्हास कदम, विठ्ठल खेडकर, रमेश मेमाणे, कानिफनाथ कारखेले, नितीन मुंढे, ऋषिकेश ताकवणे, ऋषिकेश व्यवहारे, सचिन पवार, शेखर काटे, नितीन धाडगे, समीर पिलाने, बाळासाहेब तनपुरे, किर्ती मांदळे, प्रतिक्षा पानसरे व सुहास तांबेकर यांनी केली आहे.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!