खंडणी विरोधी पथक २ गुन्हे शाखाची दमदार कामगिरी ! बेकायदेशीर पिस्तुल बाळगणा-या इसमावर कारवाई
पंकेश जाधव संपादक 7020794626
खंडणी विरोधी पथक २ गुन्हे शाखा, पुणे शहर
महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- मा. पोलीस आयुक्त श्री अमितेश कुमार यांनी गुन्हे शाखेतील सर्व पोलीस आधिकारी व पोलीस अंमलदार यांची बैठक घेवुन बेकायदेशीर शस्त्रे बाळगणारे यांच्यावर प्रभावीपणे कारवाई करण्याबाबत व मोहीम राबविणेबाबत सुचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने खालील प्रमाणे मोहीम बाबत कारवाई करण्यात आली आहे.
दि.०८/०८/२०२४ रोजी खंडणी विरोधी पथक २ गुन्हे शाखा, पुणे शहर यांचेकडील पोलीस अंमलदार अमोल घावटे, चेतन आपटे यांना मिळालेल्या बातमीवरुन आरोपी नामे प्रतिक योगेश चोरडे, वय २१ वर्षे, रा. ओमसई अर्पा. गुरूकुपा सोसायटीच्या मागील बाजुस केशवनगर मुंढवा, पुणे यांचेकडून ०१ देशी बनावटीचे पिस्तुल ०१ काडतुसे, अंदाजे किमंत २५,०००/- रु.चा मुददेमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदरचे आरोपीतावर यापुर्वी शरिराविरुध्दचे गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगिरी ही मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. शैलेश बलकवडे, मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री. अमोल झेंडे, मा. सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे २ श्री. सतिश गोवेकर, पोलीस निरीक्षक श्री, विजय कुंभार यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पो. निरी. प्रशांत संदे, पो. उपनि. श्रीकांत चव्हाण, पोलीस अंमलदार सुरेंद्र जगदाळे, अमोल घावटे, सैदोबा भोजराव, चेतन आपटे, अनिल कुसाळकर, संग्राम शिनगारे, चेतन चव्हाण, आजिनाथ येडे, प्रशांत शिंदे, पवन भोसले, गणेश खरात, चेतन शिरोळकर, अमोल राऊत, राहुल उत्तरकर, दिलीप गोरे, किशोर बर्गे, यांनी केलेली आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

