स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीणची धडाकेबाज कारवाई ! हार्डवेअर दुकानात रात्रीच्या वेळी चोरी करणारा सराईत आंतरराज्यीय गुन्हेगार साथीदारासह जेरबंद…


पंकेश जाधव संपादक 7020794626

स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण

महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- शिरुर पो.स्टे हद्दीत मागील महिन्यात हार्डवेअर दुकानामध्ये चोरी होण्याचे प्रमाण वाढले होते. त्याबाबत शिरुर पोलीस स्टेशन येथे १) गु.र.नं. ५६९/२०२४ भा.दं.वि.का.क. ३८०,४६१ २) ५७२/२०२४ भा.दं.वि.का.क. ३८०,४६१ असे दाखल झाले होते. सदर गुन्हयांचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पथकामार्फत चालू असताना सीसीटीव्ही तपासण्यात आले. गुन्हयाची कार्यपद्धतीचा अभ्यास केला. गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सदरचा गुन्हा हा रेकॉर्डवरील आरोपी नामे बनवारी उर्फ राजु मोहनलाल मीना रा. रामलिंगरोड शिरुर ता. शिरुर जि.पुणे याने त्याच्या साथीदाराच्या मदतीने केला आहे अशी खात्रीशी बातमी मिळाल्याने, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक बनवारी उर्फ राजु मोहनलाल मीना याचे हालचालीवर बारीक लक्ष ठेवुन होते, सदर गुन्हयांचे अनुषंगाने त्याने गुन्हा केल्याची खात्रीलायक माहिती प्राप्त झाल्यानंतर दि. ०१/०८/२०२४ रोजी स्था.गु.शा.चे पथकांनी सापळा रचून त्यास कारेगाव परिसरातुन आरोपी नामे १) बनवारी उर्फ राजु मोहनलाल मीना रा. रामलिंगरोड शिरुर ता. शिरुर जि. पुणे २) अक्षय प्रकाश धेंडे वय २५ रा. बाभुळसर खुर्द, संस्कृती पार्क कारेगाव ता. शिरुर जि.पुणे यांना ताब्यात घेतले. त्यांना विश्वासात घेवुन त्यांचेकडे चौकशी केली असता, त्यांनी १) शिरुर पो स्टे गु.र.नं. ५६९/२०२४ भा.दं.वि.का.क. ३८०,४६१ २) शिरुर पो.स्टे गुरनं. ५७२/२०२४ भा.दं.वि.का.क. ३८०,४६१ हे गुन्हे केल्यांचे सागितले असुन त्यांना सखोल विचारपुस करता त्यांनी ३) यवत पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं. ५९४/२०२४ भा.दं.वि.का.क. ३७९ हा गुन्हा करुन चारचाकी वाहन पिकअप चोरी केली आहे तसेच त्या पिकअपच्या मदतीने ४) शिरुर पो स्टे गु.र.नं. ६१२/२०२४ भा.न्या.सं.क ३३४(१), ३०५ अ हा गुन्हा करुन धान्य दुकानातील धान्याच्या गोणी चोरीचा केली ५) यवत पो स्टे गु.र.नं.८०६/२०२४
भा.द.वि.का.क. ३९२,३४ गुन्हे केले असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

दोन्ही आरोपीकडून वर नमुद गुन्हयांतील चोरी गेलेली पिकअप गाडी, हार्डवेअर दुकानातील पत्रा, कंपाउड जाळी, धान्याच्या गोणी असा एकूण ५,०४,६००/- किंचा मुद्देमाल हस्तगत करणेत आलेला आहे. आरोपी बनवारी उर्फ राजु मोहनलाल मीना रा. रामलिंगरोड शिरुर ता. शिरुर जि.पुणे याचे वर महाराष्ट्र व राजस्थान राज्यात मालमत्तेविरुध्दचे एकूण २० पेक्षा अधिक गुन्हे दाखल असुन तो राजस्थान राज्यातील हिस्ट्रशीटर आहे.

सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री. पंकज देशमुख, साो. पुणे ग्रामीण, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. रमेश चोपडे, पुणे विभाग, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, शिरुर विभाग, शिरुर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सपोनि राहुल गावडे, पोलीस अंमलदार पोहवा तुषार पंदारे, जर्नाधन शेळके, संजु जाधव, सचिन घाडगे, अजित भुजबळ, अतुल डेरे, राजू मोमीण, योगेश नागरगोजे, सागर धुमाळ तसेच शिरुर पोलीस स्टेशन कडील पोसई मुजावर, सहा. फौजदार देशमाने यांनी केली आहे.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!