शिक्रापुर पोलीस ठाण्याच्या खुनाच्या गुन्हयामध्ये २ वर्षापासुन पोलीसांना गुंगारा देणारा पाहिजे आरोपी युनिट ०५ गुन्हे शाखा, पुणे शहर पथकाकडुन जेरबंद”


पत्रकार :- इमरान शेख पुणे जिल्हा

गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर

महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- ग्रामीण पोलीस कडील शिक्रापुर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर १०७८/२०२२ भादवि कलम, ३०२,१४१, १४३,१४७,१४८.१४९,३४१,३२४ या गुन्हयात आरोपी नामे. धन्या ऊर्फ धनराज शांतीलाल शेरावत हा गुन्हा केल्यानंतर सुमारे ०२ वर्षापासुन स्थानिक पोलीसांना गुंगारा देवुन लपुन बसत होता.

काल दि. २८/०८/२०२४ रोजी पाहिजे आरोपी धन्या ऊर्फ धनराज शांतीलाल शेरावत, वय. २३ वर्षे, रा. सध्या म्हसोबा नगर म्हशीच्या गोटया जवळ, वेस्टन फोरजी कंपनी, सणसवाडी तळेगाव रोड, सणसवाडी, ता. शिरुर जि.पुणे हा अमरधाम स्मशानभुमीजवळ माळवाडी हडपसर पुणे या ठिकाणी आला असल्याची पक्की खबर युनिट -०५ कडील पोलीस पथकास लागल्याने त्यास सापळा रचुन युनिट ०५ चे पथकाने जेरबंद केले आहे.

आरोपी धन्या ऊर्फ धनराज शांतीलाल शेरावत यास ताब्यात घेवुन त्याची ओळख पटवुन त्याने व त्याचे साथिदारांनी मिळुन मयत इसम नामे. गोपाळ महादेव लुडकर रा. सणसवाडी याचा सणसवाडी परिसरामध्ये खुन केला असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास पुढील कार्यवाही करीता शिक्रापुर पोलीस स्टेशन, पुणे ग्रामिण यांचे ताब्यात देण्यात आलेले आहे.

सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त श्री. रंजनकुमार शर्मा, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे श्री. शैलेश बलकवडे, मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री. निखील पिंगळे, मा. सहायक पोलीस आयुक्त श्री. सतिश गोवेकर यांचे सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे युनिट ०५ गुन्हे शाखा, पुणे शहर कडील पोलीस निरीक्षक श्री. युवराज हांडे, सपोनि. कृष्णा बाबर, पोलीस अंमलदार राजस शेख, प्रमोद टिळेकर, प्रताप गायकवाड, विनोद निंभोरे, विनोद शिवले, पृथ्वीराज पांडुळे, तानाजी देशमुख, सचिन मेमाणे, शहाजी काळे, स्वाती गावडे, पल्लवी मोरे, शशिकांत नाळे, अमित कांबळे, अकबर शेख, राहुल ढमढेरे, उमाकांत स्वामी व शुभांगी म्हाळशेकर यांचे पथकाने केली आहे.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!