वनराज आंदेकर खुन प्रकरणात हत्यारे आणणे व पुरवणे यामध्ये महत्वाची भुमिका बजावणाऱ्या आरोपीस केले अटक
पंकेश जाधव संपादक 7020794626
गुन्हे शाखा युनिट २ पुणे शहर
महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- समर्थ पोलीस स्टेशन,गुन्हा रजि.नंबर 188/2024 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 103(1),61(2),सह आर्म अॅक्ट कलम 3(25),4(25),सह मपोका कायदा कलम 37 (1)(3)/135, सह क्रिमीनल लॉ अमेंडमेंट कलम 7 अन्वये सदर गुन्हयाचा तपास करत असतांना गुन्हयांचे तपासा दरम्यान युनिट 2 कडील वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री.प्रताप मानकर यांचे मार्गदर्शनाखाली पो.हवा. उज्वल मोकाशी व पो. हवा संजय जाधव यांनी तपासा मध्ये सदर गुन्ह्यामध्ये निष्पन्न झालेला आरोपी नामे संगम संपत वाघमारे वय 20 वर्ष रा.आंबेगाव पठार पुणे यास ताब्यात घेवुन सदर गुन्हयाचे अनुषंगाने त्याचेकडे तपास करता त्याने सदर गुन्ह्यात वापरलेले पिस्टल हे गुन्हयातील पोलिस कस्टडीतील आरोपी मित्र नामे आकाश म्हस्के,अनिकेत दुधभाते यांचे सह घेवुन आल्याचे सांगितले आहे.
सदर गुन्हयात संगम वाघमारे याने हत्यारे आणणे पुरवणे यामध्ये महत्वाची भुमिका बजावली आहे.त्यास दाखल गुन्हयात अटक करण्यात आली असुन त्यास मा.न्यायालयाने 11 सप्टेंबर पर्यत पोलिस कोठडी सुनावली आहे.दाखल गुन्ह्यामध्ये आत्तापर्यंत एकूण 15 पुरुष आरोपी व 1 महिला आरोपी यांना अटक करण्यात आलेले असून तीन विधी संघर्षित बालकांना ताब्यात घेण्यात आलेले आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

