गुन्हे शाखा युनिट ६ ची कौतुकास्पद कामगिरी ! आर्म अॅक्ट गुन्हयातील पाहिजे आरोपी अग्निशस्त्रासह जाळ्यात


इरफान शेख पुणे जिल्हा प्रतिनिधी 
युनिट ६ गुन्हे शाखा, पुणे शहर

महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दिनांक ०७/११/२०२४ रोजी युनिट ६ कडील पथकाकडुन आरोपी नामे साहिल राजु शेख, वय २४ वर्षे व जैद जावेद खान, वय २२ वर्षे यांचेकडुन तीन अग्निशस्त्रे व चार जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली होती. सदरबाबत कोंढवा (काळेपडळ) पोलीस स्टेशन गु.र.नं. १२४३/२०२४ आर्म अॅक्ट कलम ३, २५, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (अ) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयाचा तपास गुन्हे शाखा, युनिट ६ कडुन करीत असताना, सदर गुन्हयाचे तपासादरम्यान इसम नामेहा पाहिजे आरोपी असल्याचे निष्पन्न झाल्याने सदर आरोपीचा युनिट कडील पथकाकडुन शोध चालु होता.

दिनांक १८/१२/२०२४ रोजी गुन्हे शाखा युनिट ६ कडील पथकास मिळालेल्या गोपनीय बातमीवरून पाहिजे आरोपी नामे रेहान नझीर कुरेशी हा सय्यदनगर, हडपसर, पुणे येथे आला असुन त्याचेकडे अग्निशस्त्र असलेबाबत खात्रीशीर बातमी मिळाल्याने गुन्हे शाखा युनिट ६ कडील प्रभारी पोलीस निरीक्षक श्री. वाहीद पठाण, पोलीस उप-निरीक्षक रामकृष्ण दळवी व युनिट कडील पथकाने सदर ठिकाणी जावुन सापळा रचुन नमुद आरोपीतास सय्यदनगर, हडपसर पुणे येथुन ताब्यात घेतले आहे. नमुद आरोपीची सखोल चौकशी करून त्याचे ताब्यातून एक देशी बनावटीचे लोखंडी पिस्टल व एक जिवंत काडतुस अंगझडती पंचनाम्याने हस्तगत करण्यात आली.
सदरची कामगीरी मा. अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री शैलेश बलकवडे, मा. पोलीस उपआयुक्त (गुन्हे) श्री. निखिल पिंगळे, मा. सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. राजेंद्र मुळीक गुन्हे शाखा, यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट ६ चे प्रभारी पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, सहा. पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी, पोलीस अंमलदार बाळासाहेब सकटे, रमेश मेमाणे, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, ऋषीकेश ताकवणे, सचिन पवार, ऋषीकेश व्यवहारे, शेखर काटे, गणेश डोंगरे, शेखर काटे, नितीन धाडगे, बाळासाहेब तनपुरे, सुहास तांबेकर, मपोअं. प्रतिक्षा पानसरे, किर्ती मांदळे यांनी केली आहे.

Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!