११ वर्षापासुन पोलीसांना गुंगारा देणा-या अट्टल गुन्हेगाराला युनिट ०५ गुन्हे शाखा पथका कडुन जेरबंद
पंकेश जाधव संपादक 7020794626
युनिट ०५ गुन्हे शाखा पुणे शहर
महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :-लोणी काळभोर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर २८१/२०१४ भा.द.वि कलम भादवि कलम ४५४,४५७,३८० या गुन्हयामधील निष्पन्न पाहिजे आरोपी बंटया ऊर्फ संतोष दिलीप काळे रा.जावडा एस.टी.स्टॅन्ड जवळ, जामखेड अहमदनगर हा त्याची स्वतःची अटक चुकवुन पोलीसांना चकवा देवुन वेगवेगळ्या ठिकाणी वास्तव्य करीत होता.
पोलीस अंमलदार शशिकांत नाळे यांना त्यांचे बातमीदाराने बातमी दिली की, पाहिजे आरोपी बंटया ऊर्फ संतोष दिलीप काळे रा. जावडा एस.टी. स्टॅन्ड जवळ, जामखेड अहमदनगर हा बारामती या ठिकाणी आहे अशी बातमी मिळाल्याने लागलीच वरिष्ठांचे आदेश व सुचनांप्रमाणे युनिट ०५ कडील सहायक पोलीस निरक्षक विजयकुमार शिंदे, पोलीस अंमलदार नाळे, विनोद शिवले व अकबर शेख यांनी बारामती या ठिकाणी जावुन आरोपी बंट्या ऊर्फ संतोष काळे याचा कोणताही माग नसताना शोध घेवुन त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. सदर आरोपी हा सुमारे ११ वर्षापासुन घरफोडी, दरोडा व दरोड्याची तयारी अशा एकुण ०३ गंभीर गुन्हयामधील पाहिजे आरोपी होता. आरोपीस पुढील कार्यवाहीकामी लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आलेले आहे.
सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे श्री. शैलेश बलकवडे, मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री. निखिल पिंगळे, मा. सहायक पोलीस आयुक्त गुन्हे २ श्री. राजेंद्र मुळीक यांचे सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे युनिट ०५ गुन्हे शाखा, पुणे शहर कडील पोलीस निरीक्षक श्री. युवराज हांडे, सहा. पो. नि. विजयकुमार शिंदे, पोलीस अंमलदार शशिकांत नाळे, विनोद शिवले व अकबर शेख यांचे पथकाने केली आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

