अवैध धंद्यावर घनाघात, हातभट्टी दारु, व जुगार अड्डयावर केली कारवाई
पंकेश जाधव संपादक 7020794626
लोणी काळभोर पोलीस स्टेशन पुणे शहर
महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- लोणी काळभोर पोलीस ठाणेचे हद्दीत वरिष्ठाचे आदेश व मार्गदर्शनाप्रमाणे लोणी काळभोर पोलीस ठाणे हद्दीतील अवैध धंद्यांवर धडक कारवाई करण्याची मोहिम सुरु केली होती या मोहिमेदरम्यान दि.२१/०१/२०२५ रोजी रामदरारोड, लोणी काळभोर पुणे येथे रेकॉर्डवरील महिला नामे प्रेमलता मुकेश कुमावत वय ४५ वर्षे रा. मंतरवाडी, फुरसुंगी पुणे ही गावठी हातभट्टी दारु तयार करुन विक्री करत असल्याची बातमी प्राप्त झाल्याने त्याठिकाणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांचे आदेशानुसार पोउपनि अनिल जाधव, पोलीस उप निरीक्षक पुजा माळी, व स्टाफ यांनी सापळा रचुन छापा कारवाई केली. सदर छापा कारवाई दरम्यान सदर महिला आरोपीकडुन एकुण ८८,७००/- रुपयांचा हातभट्टी दारु तयार करण्याचे रसायण जप्त करणेत आले आहे.
तसेच दि.१८/०१/२०२५ रोजी काळुबाई मंदिराचे पाठीमागे, गारुडी गल्ली, लोणी काळभोर, पुणे येथे रेकॉर्डवरील महिला नामे संगिता तानाजी भाले वय ५५ वर्षे रा. गारुडी गल्ली, लोणी काळभोर, पुणे ही गावठी हातभट्टी दारु विक्री करत असल्याची बातमी प्राप्त झाल्याने त्याठिकाणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांचे आदेशानुसार पोउपनि अनिल जाधव, पोलीस उप निरीक्षक पुजा माळी व स्टाफ यांनी सापळा रचुन छापा कारवाई केली. सदर छापा कारवाई दरम्यान सदर महिला आरोपीकडुन एकुण ३२००/- रुपयांची सुमारे ३२ लीटर गावठी हातभट्टी दारु जप्त करणेत आली आहे.
दि.२२/०१/२०२५ रोजी बोस्टन चहाचे पाठीमागे, लोणी स्टेशन, कदमवाकवस्ती, पुणे येथे रेकॉर्डवरील सराईत जुगार चालक इसम नामे तात्यासाहेब महादेव ससाणे, वय ५० वर्षे रा. लोणी स्टेशन, कदमवाकवस्ती, पुणे हा बेकायदेशीररित्या मटका जुगार खेळत असल्याची बातमी प्राप्त झाली. सदर बातमी प्राप्त होताच त्याठिकाणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी स्वतः पोलीस उप निरीक्षक बोबडे, ग्रे. पोलीस उप निरीक्षक जगदाळे, व स्टाफ यांचेसह सापळा रचुन छापा कारवाई केली. सदर छापा कारवाई दरम्यान सदर आरोपी नामे तात्यासाहेब सहाणे याचेकडुन एकुण ३३५०/- रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करणेत आले आहे.
सदरची कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ०५, डॉ. राजकुमार शिंदे, मा. सहा. पोलीस आयुक्त, हडपसर विभाग, श्रीमती अनुराधा उदमले, लोणीकाळभोर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र पन्हाळे यांचे आदेश व मार्गदर्शनाप्रमाणे पोउपनि अनिल जाधव, पोलीस उप निरीक्षक पुजा माळी, पोलीस अंमलदार सातपुते, शिंदे, देवीकर, नागलोत, वाघमोडे, विर, कुदळे, पाटील, शिरगिरे, गाडे, कर्डीले नानापुरे यांनी केली आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

