पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हे देशातील पहिले आधुनिक असे आयुक्तालय होणार :फडणवीस
डॅनियल अँथोनी पुणे ब्युरो चिफ
महा.पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हे देशातील पहिले प्रशस्त आणि आधुनिक असे आयुक्तालय होणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
—————————————
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालय ,महाळुंगे औद्योगिक पोलीस स्कूल ,पोलीस विश्रामगृह देहूरोड या इमारतींचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा समारंभ दरम्यान मुख्यमंत्री पिंपरी चिंचवड शहरात गुरुवार (ता०६)रोजी आले होते.
याप्रसंगी उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्हा पालकमंत्री, अजित पवार,गृहराज्यमंत्री योगेश कदम ,जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील ,आमदार अमित गोरख,आमदार महेश लांडगे ,आमदार शंकर जगताप ,आमदार अण्णा बनसोडे ,आमदार सुनील शेळके ,पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे ,आयुक्त पंकज देशमुख ,आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की ,पुणे शहराप्रमाणे पिंपरी चिंचवड शहराची लोकसंख्या वाढत आहे त्यामुळे या शहरात स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाची इमारत होणे गरजेचे होते .सीएसआर फंडातून देखील विविध विकास कामे केली जात आहेत .औद्योगिक क्षेत्राला चालना मिळाली पाहिजे त्रास देणाऱ्या वर कडक कारवाई करा .प्रसंगी मोका सारखी कारवाई करा.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले ,की पिंपरी चिंचवड शहराची लोकसंख्या पुणे शहरापेक्षा झपाटणे वाढत आहे पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराच्या विकास कामासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे विविध प्रकल्प देखील राबविले गेले आहेत हे सरकार तरुणांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणारे सरकार आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार व्यासपीठावर उपस्थित असताना आमदार महेश लांडगे यांनी विकास कामात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा वाटा असल्याचा उल्लेख केला मात्र आमदार लांडगे यांनी विकास कामांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव घेण्यास विसरले .हे बहुदा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आवडले नसावे ,त्यांनी भाषणात आपल्या शैलीत आमदार महेश लांडगे यांना चिमटा काढला .ज्यांनी चांगलं काम केले त्याला चांगलं म्हणायला शिका …असा टोला आमदार महेश लांडगे यांना लगावला .तसेच १९९२ते २०१७या काळात पिंपरी चिंचवड या शहराच्या विकास करण्यामध्ये आमचा मोलाचा वाटा असल्याची आठवण देखील त्यांनी करून दिली.
पिंपरी चिंचवड शहरात पोलीस आयुक्तालयाकरिता स्वतंत्र जागा उपलब्ध व्हावी ,याकरिता पोलीस आयुक्त विनयकुमार चोबे हे स्वतः मंत्रालयात पाठपुरावा करीत होते .विधानसभा निवडणूकापूर्वी त्यांनी या जागेची भूमिपूजन करावे अशी इच्छा व्यक्त केली होती .मात्र काही कायदेशीर बाबी पूर्ण केल्यानंतर आपण भूमिपूजन करू असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात सांगत पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या समय सुचकतेचे कौतुक केले.
पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी प्रास्ताविक भाषणात पोलीस आयुक्त यांनी पिंपरी चिंचवड पोलीस दलाचे आतापर्यंतची माहिती ग्राफिकच्या माध्यमातून दिली .
दरम्यान दिशा फाउंडेशन मधील बालकांचा सन्मान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी यांनी मान्यवरांचे आभार मानले.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

