काळेपडळ पोलीसांची दमदार कारवाई !अवैद्य गावठी हातभट्टी दारूचा साठा उध्वस्त करुन ३,०८,९००/-रु. कि.चा मुद्देमाल जप्त
पंकेश जाधव मुख्य संपादक 7020794626
काळेपडळ पोलीस स्टेशन पुणे शहर
महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- मा. पोलीस आयुक्त साो, पुणे शहर यांनी पुणे शहरामध्ये कोणतेही अवैध धंदे चालणार नाही असे आदेशीत केले आहे. त्याअनुषंगाने मानसिंग पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, काळेपडळ पोलीस ठाणे, पुणे शहर यांनी तपास पथक अंमलदार यांना अवैध धंदे व वाहतुक यावर कारवाई करणेबाबत सुचना दिल्या होत्या.
वरिष्ठांनी दिलेले आदेश/सुचनांप्रमाणे दिनांक ०४/०३/२०२५ रोजी काळेपडळ पोस्टे कडील सहा पोलीस निरीक्षक गायकवाड, सपोफौ रमेश गरुड, पोलीस हवालदार ३९७७ दाऊंद सय्यद, पोलीस हवालदार अमोल फडतरे, पोलीस हवालदार ७९५० संजय देसाई, पोलीस हवालदार ७३१८ परशुराम पिसे, पोलीस अंमलदार ८६४८ अतुल पंधरकर, पोलीस अंमलदार १००७०, सद्दाम तांबोळी, पोलीस अंमलदार शाहिद शेख असे पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पोलीस हवालदार ३९७७ दाऊद सय्यद यांना गोपनीय बातमी मिळाली की, स. नं. १३, आदर्श नगर, हांडेवाडी ट्रेड पार्क जवळ, उरुळी देवाची, पुणे येथे इसम नामे अजित संतोष जयस्वाल राहणार काळेपडळ, हडपसर, पुणे हा एका पत्र्याचे शेडमध्ये गावठी हातमट्टी दारु काढण्यासाठी लागणारे साहीत्य गोळा करुन, वाहतुक करुन गावठी हातभट्टी दारु विक्री करीत असलेची बातमी मिळाल्याने बातमीच्या आधारे मा. मानसिंग पाटील, वपोनि साो. काळेपडळ पोलीस ठाणे व वर नमूद पोलीस स्टाफ यांनी स. नं. १३, आदर्श नगर, हांडेवाडी ट्रेड पार्क जवळ, उरुळी देवाची, पुणे येथे सापळा रचून हातभट्टीवर छापा टाकून कारवाई केली. सदर छापा कारवाईमध्ये दारु विक्री करीत असणारा इसम अजित संतोष जयस्वाल यास ताब्यात घेवून सदर ठिकाणावरुन तयार हातभट्टीच्या दारुने भरलेले एकुण ४४ कॅनमध्ये भरुन ठेवलेली १,५४० लिटर गावठी दारुचा साठा एकुण ३,०८,९००/- रु.कि.चा मुद्देमाल जप्त करुन साठा करणेकरीता बनविण्यात आलेले पत्र्याचे शेड जेसीबीच्या सहाय्याने उध्वस्त करण्यात आले आहे.
त्याबाबत काळेपडळ पोलीस ठाणेस गु.र.नं.५५/२०२५ भा.न्या.सं. कलम १२३ प्रमाणे सह महाराष्ट्र दारुबंदी अधिनियमसन १९४९ कलम ६५ (ई) (ड) (फ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सहा पोलीस निरीक्षक शेटे हे करीत आहेत.
सदरची कामगिरी ही मा. श्री. अमितेश कुमार, पोलीस आयुक्त साो पुणे शहर, मा. श्री. रंजन कुमार शर्मा, पोलीस सह आयुक्त साो. पुणे शहर, मा. श्री. मनोज पाटील, अप्पर पोलीस आयुक्त साो, पुर्व प्रादेशिक विभाग, मा. डॉ. श्री. राजकुमार शिंदे, पोलीस उप आयुक्त साो., परिमंडळ ५ यांचे मागदर्शनाखाली मा. सहाय्यक पोलीस आयुक्त साो. धन्यकुमार गोडसे, वानवडी विभाग पुणे, मानसिंग पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, काळेपडळ पोलीस स्टेशन, पुणे शहर, यांचे सुचनेप्रमाणे सहा पोलीस निरीक्षक गायकवाड, सपोफौ रमेश गरुड, पोलीस हवालदार ३९७७ दाऊद सय्यद, पोलीस हवालदार अमोल फडतरे, पोलीस हवालदार ७९५० संजय देसाई, पोलीस हवालदार ७३१८ परशुराम पिसे, पोलीस हवालदार ४७१७ कांबळे, पोलीस अंमलदार ८६४८ अतुल पंधरकर, पोलीस अंमलदार १००७०, सद्दाम तांबोळी, पोलीस अंमलदार शाहिद शेख यांचे पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

