युनिट ६ गुन्हे शाखाची दमदार कामगिरी ! तडीपार आरोपीस धारदार शस्त्रासह घेतले ताब्यात
उषा सोनवणे पुणे प्रतिनिधी
युनिट ६ गुन्हे शाखा, पुणे शहर
महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दि.०४/११/२०२५ रोजी गुन्हे शाखा युनिट ६ कडील पोलीस निरीक्षक श्री. वाहीद पठाण व पोलीस अंमलदार असे हद्दीत गुन्हे प्रतिबंधक गस्त करत असताना पोलीस अंमलदार नितीन घाडगे यांना गोपनीय माहिती मिळाली की, रेकॉर्ड वरील तडीपार आरोपी नामे आदित्य दिपक कांबळे वय १९ वर्षे, रा. सिद्धीविनायक पार्क, लेन नंबर १, आव्हाळवाडी रोड, वाघोली ता. हवेली जि.पुणे हा रायसोनी कॉलेजचे लगत असणाऱ्या मैदानामध्ये डोमखेलवस्ती रोड आव्हाळवाडी, ता. हवेली जि. पुणे येथे धारदार हत्यारासह थांबलेला आहे. सदर माहितीच्या अनुषंगाने युनिट ६ चे पथकाने सदर ठिकाणी जावुन पाहणी केली असता सदरचा इसम हा पोलीसांना पाहुन त्याचे हातातील धारदार हत्यार लपवत असल्याचे दिसला. तसेच पथक त्यारा ओळखत असल्याने मिळालेल्या बातमीतील तडीपार गुन्हेगार हा तोच असल्याची खात्री झाल्याने त्यास धारदार हत्यारासह ताब्यात घेवुन त्याच्याविरुध्द वाघोली पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगीरी मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप-आयुक्त गुन्हे श्री. निखिल पिंगळे, मा. सहा. पोलीस आयुक्त गुन्हे पुणे शहर श्री. राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली युनिट -६ गुन्हे शाखा चे पोलीस निरीक्षक श्री. वाहीव पठाण यांचे सुचनाप्रमाणे गुन्हे शाखा, युनिट ६ कडील सहा. पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस अंमलदार सारंग दळे, बाळासाहेब सकटे, निलेश साळवे, विनायक साळवे, गिरीष नाणेकर, कानिफनाथ कारखेले, नितीन मुंढे. सुहास तांबेकर, नेहा तापकीर, नितिन धाडगे, ऋषीकेश व्यवहारे, शेखर काटे, प्रतिक्षा पानसरे, कीर्ती मांदळे व सोनाली नरवडे यांनी केली आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

