सराईत आरोपीकडुन मोबाईल फोन व दुचाकी असा एकुण ७०,०००/-रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त


पंकेश जाधव मुख्य संपादक 7020794626
बडगार्डन पोलीस स्टेशन पुणे शहर
महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- फिर्यादी नामे रविशंकर बंडप्पा खुबा, वय-३१ वर्षे, काम ड्रायव्हर, रा. कात्रज चौक जैन मंदिराजवळ कात्रज पुणे हे शिन्दे वाहनतळा कडुन समोरील कात्रज बस स्टॉप चालत जात असताना दुचाकीवरील दोन अनोळखी इसमांनी फिर्यादी यांचा मोबाईल फोन हिसका मारुन जबरीने चोरुन नेले बाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारी वरुनं बंडगार्डन पोलीस ठाणे गु.र.नं. ३२९/२०२५ भा. न्याय संहिता कलम ३०४(२), ३(५) प्रमाणे जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. नमुद गुन्हा लवकरात लवकर उघडकिस आणण्याचे दृष्टीने वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संतोष पांढरे, बंडगार्डन पोस्टे यांनी तपास पथकाचे अधिकारी व पोलीस अंमलदार यांना योग्य त्या सुचना मार्गदर्शन केले होते.
तपास पथकातील अधिकारी व अंमलदार असे फिर्यादी यांनी दिलेल्या वर्णनाचे इसमांचा पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग दरम्यान शोध घेत असताना सदर वर्णनाचा इसम विना नंबर प्लेट दुचाकीवरुन जात असताना दिसुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन त्याचेकडे गुन्हयाचे संबधीने तपास केला असता त्याने राजगड पोलीस ठाणे, पुणे ग्रामीण, स्वारगेट पोलीस ठाणे व बंडगार्डन पोलीस ठाणे हद्दीत गुन्हे केल्याची केल्याचे तपासात निष्पन्न झाले असुन आरोपी नामे अर्जुन हिराजी भोसले वय २३ वर्षे रा. अप्पर इंदिरानगर, व्हिआयटी कॉलेज जवळ, बिबेवेवाडी, पुणे यास दिनाक ०३/११/२०२५ रोजी अटक करण्यात आलेली असुन मा. न्यायालयाने आरोपीस दिनांक ०६/११/२०२५ रोजी पर्यत पोलीस कस्टडी सुनावली आहे. दाखल गुन्हयाचे तपासा दरम्यान आरोपी कडुन राजगड पो.स्टे. गु.र.नं. ४०२/२०२५ भा. न्याय संहिता कलम ३०३ ०३ (२).३ (२).३(५) (५) प्रमाणे, स्वारगेट पो.स्टे. गु.र.नं.३०६/२०२५ भा. न्याय संहिता कलम ३०४ (२), ३ (५) प्रमाणे असे गुन्हे उघड करुन आरोपी कडुन जबरीने चोरी केलेले ०२ मोबाईल फोन व एक दुचाकी मो. सायकल असा एकुण ७०,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. आरोपीवर पुणे शहरात विविध ठिकाणी एकुण ०९ गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगिरी मा. अमितेश कुमार, पोलीस आयुक्त सोो, पुणे शहर, मा. रंजनकुमार शर्मा सोो, पोलीस सह. आयुक्त, मा. राजेंद्र बनसोडे सोो, अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे, मा. श्री. मिलिंद मोहिते, पोलीस उप आयुक्त परिमंडळ २. मा. श्रीमती. संगिता आल्फान्सो शिंदे सो, सहाय्यक पोलीस आयुक्त लष्कर विभाग, मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे, मा. पोलीस निरिक्षक (गुन्हे) निलकंठ जगताप यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप-निरीक्षक धिरज गुप्ता, गणेश चव्हाण, मोहन काळे, पोलीस अंमलदार प्रदिप शितोळे, सारस साळवी, प्रकाश आव्हाड, महेश जाधव, ज्ञानेश्वर बडे, मनिष संकपाळ, मनोज भोकरे, शिवाजी सरक, ज्ञानेश्वर गायकवाड, बाळासाहेब भांगरे, तुकारामः हिवाळे यांचे पथकाने केली आहे.

Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!