परवान्यावरील शस्त्राचा गैरवापर करणारे दिनेश सिंग व गणपत जगताप यांचे शस्त्र परवाने रद्द…”
जोसेफ नडेसन पुणे प्रतिनिधी
बावधन पोलीस स्टेशन पिंपरी चिंचवड
महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- बावधन पोलीस ठाणे हद्दीत एका फार्महाऊसवर दिनांक ०८/०७/२०२५ रोजी पार्टीचे वेळी परवानाधारक दिनेश बाबुलाल सिंग, रा.मामुडीं, देहुरोड, पुणे यांनी त्यांचेकडील पिस्टल मधुन हवेत २ राउंड फायर करुन उपस्थितांचे जिवीतास धोका उत्पन्न केला. याबाबत त्यांचे विरुध्द बावधन पोलीस ठाणे येथे गु.र.नं २९५/२०२५ भा.न्या.सं कलम ११०,१२५,३५१ (२), क्रि.लॉ. अमेंटमेंट कलम ७. आर्म अॅक्ट ३० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात शस्त्राचा गैरवापर केल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक, बावधन पोलीस ठाणे यांनी त्यांचा शस्त्र परवाना रद्द होणे बाबतचा प्रस्ताव पोलीस आयुक्त कार्यालय, पिंपरी चिंचवड येथे सादर केला होता.
तसेच यवत पोलीस ठाणे, पुणे ग्रामीण हद्दीत अंबिका कला केंद्र, यवत येथे दिनांक २१/०७/२०२५ रोजी परवानाधारक गणपत बाजीराव जगताप, रा. मारुंजी, पुणे यांनी त्यांचेकडील शस्त्र बेकायदेशिरपणे इतर इसमास दिल्याने त्या इसमाकडुन हवेत राऊंड फायर करुन उपस्थितांचे जिवीतास धोका उत्पन्न केला. याबाबत त्यांचे विरुध्द यवत पोलीस ठाणे, पुणे ग्रामीण येथे गु.रं.नं ६३०/२०२५ भा.न्या.से कलम १२५, सह भारतीय हत्यार कायदा कलम ३(२५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात शस्त्राचा गैरवापर केल्याने पोलीस अधिक्षक, पुणे ग्रामीण, यांनी त्यांचा शस्त्र परवाना रद्द होणे बाबतचा प्रस्ताव पोलीस आयुक्त कार्यालय, पिंपरी चिंचवड येथे सादर केला होता.
सदर दोन्ही परवानाधारकांनी इतर व्यक्तींच्या जिवीतास व सुरक्षिततेस धोका निर्माण होईल असे कृत्य करुन परवाना दिलेल्या शस्त्रांचा गैरवापर केला. त्यामुळे मा. पोलीस आयुक्त श्री. विनय कुमार चौबे यांनी घडलेल्या दोन्ही गंभीर घटनांची तात्काळ दखल घेवुन त्यांचे शस्त्र परवाने रद्द करणेसाठी प्राथमिक चौकशी केली. चौकशीअंती परवानाधारक यांनी त्यांचेकडील शस्त्रांचा गैरवापर केल्याचे आढळुन आल्याने दिनांक ०७/११/२०२५ रोजी नमुद परवानाधारक यांचे शस्त्र परवाने रद्द करण्यात आले आहेत.
यापुर्वी परवान्यावरील शस्त्रांचा गैरवापर करणारे परवानाधारक संतोष दत्तात्रय पवार, रा. कुदळवाडी, चिखली, पुणे व संतोष पांडुरंग कदम, रा. ताथवडे, पुणे यांचेदेखील शस्त्र परवाने रद्द केलेले आहेत. एकंदरीत सन २०२५ मध्ये परवान्यावरील शस्त्रांचा गैरवापर करणारे एकुण ०४ परवानाधारक यांचेकडील शस्त्र परवाने मा. पोलीस आयुक्त श्री. विनय कुमार चौबे यांनी रद्द केलेले आहेत.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

