हॉटेलमध्ये चालु असलेल्या वेश्या व्यवसायावर छापा टाकुन ०१ आरोपीस केले अटक
पंकेश जाधव मुख्य संपादक 7020794626
अनैतिक मानवी वाहतुक व व्यापार प्रतिबंध कक्ष, गुन्हे शाखा, पुणे शहर
महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दिनांक २०/११/२०२५ रोजी पोलीस अंमलदार तुषार भिवरकर अनैतिक मानवी वाहतुक व व्यापार प्रतिबंध कक्ष, गुन्हे शाखा, पुणे शहर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कोरेगाव पार्क पुणे परिसरामध्ये इसम (एजंट) हा विदेशी च परराज्यतील मुलींना वेश्या व्यवसायासाठी आणुन त्यांचेकडुन वेश्या व्यवसाय करुन घेत असलेबाबत बामती प्राप्त झाली. सदर बाबत पोलीस निरीक्षक श्रीमती आशालता खापरे यांचे मार्गदर्शनाखाली तात्काळ बातमीची पडताळणी करुन बनावट ग्राहक बनुन सदर बातमीची खात्री करुन द हेवन हॉटेल येथे अचानक छापा टाकुन आरोपी नामे १) आदित्य अनिलकुमार सिंह, वय ३१ वर्षे, रा. साईबाब मंदिर, जर्मन बेकरी जवळ, कोरेगाव पार्क, पुणे. व एजंट साथीदार यांनी वेश्या व्यवसायासाठी आणलेल्या ०१ पिडीत विदेशी महिला व ०२ परराज्यातील महिलांची सुटका करण्यात आली. सदर आरोपी क्र.१ यास अटक करण्यात आली.
सदर प्रकरणी वरील दोन्हीं आरोपींविरुध्द दि.२१/११/२०२५ रोजी कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन गु.र.नं. १३३/२०२५, अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ कलम ३,४,५, व भा. न्या. सं. कलम १४३, ३(५) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची नमुद कारवाई ही मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पुणे शहर, श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, श्री. निखील पिंगळे, मा. सहा पोलीस आयुक्त, गुन्हे. ३. श्री. शंकर खटके यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीमती आशालता खापरे, पोलीस उप-निरीक्षक विशांत चव्हाण, पोलीस अंमलदार, दत्ताराम जाधव बबनराव केदार, तुषार भिवरकर, ईश्वर आंधळे, इम्रान नदाफ, अमेय रसाळ, वैशाली खेडेकर, रेश्मा कंक, वैशाली इंगळे, भुजबळ गुन्हे शाखा, पुणे शहर यांनी केली आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

