गुन्हे शाखा, युनिट-४ ची दमदार कामगिरी ! रात्रीच्या वेळी घरफोडी करणाऱ्या इसमास घेतले ताब्यात
महेश कांबळे पुणे प्रतिनिधी
गुन्हे शाखा, युनिट-४, पुणे शहर.
महा पोलीस न्यूज ! ऑनलाइन पुणे :- युनिट-०४ चे पथक विश्रांतवाडी पोलीस स्टेशनचे हद्दीत गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करत असताना पथकाला बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, चंदननगर परिसरात घरफोडी करणारा बबल्या चौगुले हा काळया रंगाच्या स्प्लेंडर मोटार सायकलवर घरफोडीतील सोन्याचे दागिने विक्री करण्याकरीता खडकी भागात येणार आहे. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने युनिट-०४ चे पोलीस पथक होळकर ब्रिजजवळ सापळा लावुन थांबले. थोड्याच वेळात बातमीतील इसम दुचाकीसह आलेला दिसल्याने त्यास सदर पोलीस पथकाने ताब्यात घेतले त्यास त्याचे नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव रुतीक ऊर्फ बबलु संजय चौगुले, वय २१ वर्षे, रा. वॉटर सप्लाय शेजारी झोपडपट्टी, आळंदी रोड फुलेनगर, विश्रांतवाडी, पुणे. असे असल्याचे सांगितले.
सदर आरोपीकडे अधिक तपास केला असता त्याचेकडे सोन्याचे दागिने मिळुन आले. सदर सोन्याच्या दागिन्याबाबत विचारणा केली असता सदरचे दागिने त्याने त्याचे इतर दोन साथीदारांचे मदतीने दि.१०/११/२०२५ रोजी पहाटे घर फोडी करुन चोरले असल्याचे कबुल केले. त्याचेकडुन एकुण २,६७,२००/- चे सोन्याचे दागिने व एक स्प्लेंडर मोटार सायकल जप्त करणेत आली आहे. आरोपीला पुढील कायदेशीर कारवाई करीता चंदननगर पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आले. पुढील तपास चंदननगर पोलीस स्टेशन करीत आहे.
सदरची कामगिरी मा.अपर पोलीस आयुक्त गुन्हे, पुणे शहर, श्री पंकज देशमुख, मा. पोलीस उप-आयुक्त गुन्हे, पुणे शहर, श्री. निखिल पिंगळे, मा. सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-२, पुणे शहर, श्री. राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली युनिट ४ कळील मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अजय वाघमारे यांचे सुचनेप्रमाणे सहा. पोलीस निरीक्षक अमर कदम, पोलीस उप-निरीक्षक वैभव मगदुम, पोलीस अंमलदार हरीष मोरे, किशोर दुशिंग, सुभाष आव्हाड, अमजद शेख, तुषार खराडे, संजय आढारी, विठ्ठल वाव्हळ, प्रविण भालचिम व भरत गुंडवाड यांनी केली.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

