रेकॉर्डवरील आरोपी श्वेतांग निकाळजे याचे कडुन दोन अग्नीशस्त्र केले जप्त.
रवी गायकवाड पुणे प्रतिनिधी
भारती विद्यापीठ, पोलीस स्टेशन, पुणे शहर.
महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दि.०८/११/२०२५ रोजी ११/४५ वा. चे सुमा. फिर्यादी यास त्याचे राहते घराचे पार्कीगमधुन आरोपी याने लग्न करु नये व एअरटेल कंपनीचे टॉवरचे कॉन्ट्रॅक्टचे पैसे दयावे या उद्देशाने त्याचे साथीदारांसह जबरदस्तीने त्याचे चारचाकी गाडीमध्ये घेवुन जावुन भोर रोडवर उतरुन त्याचेकडील दोन पिस्टल काढुन फिर्यादी यांचे डोक्यावर लावुन ” तुला कोणत्या पिस्टलमधुन गोळी घालु” अशी धमकी देवुन, इतर दोन साथीदार यांनी तु भाऊचे ऐकत नाहीस तुझ्या डोक्यात कोयता टाकतो अशी धमकी दिली आहे. तसेच त्यांचे तावडीतुन मी पळुन गेलेच्या रागातुन त्या तिघांनी व साथीदार यांनी त्याचा मित्रांस शिवाजीनगर येथे घेवुन जावुन त्यास मारहाण करुन त्यास पिस्टल लावुन धमकाविले आहे म्हणून तक्रारदार यांनी दिले तक्रारीवरुन भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गु.र.नं. ५०७/२०२५. भारतीय न्याय संहीता कलम १४०(२), १२७(२), ३५१ (३) ३५२, ३(५), भारतीय हत्यार कायदा कलम ३,२५, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (३), १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दाखल गुन्हयातील आरोपीचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार महेश बारवकर, मंगेश पवार, मंगेश गायकवाड, किरण साबळे, अभिनय चौधरी यांचेकडुन प्राप्त झालेल्या माहीतीवरुन आरोपी १) श्वेतांग भास्कर निकाळजे, वय ३७ वर्षे, रा.३३५ मंगळवार पेठ, भिमनगर, पुणे २) ओम संजय गायकवाड, वय २६ वर्षे, रा. सदर यांना दाखल गुन्हयामध्ये दि.२०/११/२०२५ रोजी अटक करण्यात आली आहे. सदर आरोपींकडे अधिक तपास केला असता आरोपी नं. ०१ याचेकडुन गुन्हयात वापरलेले दोन अग्नीशस्त्र व गुन्हयात वापरलेली चारचाकी गाडी असा एकुण ६ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे.
सदरची कामगिरी मा.अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे शहर, श्री. मनोज पाटील, मा.पोलीस उप-आयुक्त परिमंडळ २. पुणे शहर, श्री. मिलींद मोहीते. मा. सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे शहर, श्री. राहुल आवारे, यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राहुल खिलारे यांचे सुचनेप्रमाणे तपास पथकाचे अधिकारी पोलीस उप-निरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार, महेश बारवकर, मंगेश पवार, सचिन सरपाले, मंगेश गायकवाड, किरण साबळे, मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे, निलेश खैरमोडे, तुकाराम सुतार व संदीप आगळे यांनी केली

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

